Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 16 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फणसाच्या बिया फेकण्याआधी थांबा! व्हिटॅमिन्स-मिनरल्सचा आहे खजिना, कशाप्रकारे सेवन करावे? जाणून घ्या सविस्तर

Jackfruit Seeds Benefits : फणसाचे गरे खाऊन याच्या बिया फेकून देताय का? मग तुम्ही फार मोठी चूक करत आहात. या बियांंमध्ये अनेक असे पोषक घटक आढळून येतात जे आरोग्याच्या समस्याच नाही तर त्वचा, डोळे आणि पचनाच्या अनेक समस्यांना दूर पळवण्यास मदत करते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 16, 2026 | 08:15 PM
फणसाच्या बिया फेकण्याआधी थांबा! व्हिटॅमिन्स-मिनरल्सचा आहे खजिना, कशाप्रकारे सेवन करावे? जाणून घ्या सविस्तर

फणसाच्या बिया फेकण्याआधी थांबा! व्हिटॅमिन्स-मिनरल्सचा आहे खजिना, कशाप्रकारे सेवन करावे? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • अनेकजण दुर्लक्ष करत असलेल्या फणसाच्या बियांमध्ये शरीरासाठी उपयुक्त पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात.
  • योग्य पद्धतीने आहारात समावेश केल्यास पचन आणि एकूण आरोग्याला फायदा होऊ शकतो.
  • स्वयंपाकातील विविध पदार्थांमध्ये याचा वापर करून चव आणि पोषणमूल्य दोन्ही वाढवता येतात.
उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात फणस हे फळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याची चव फार आवडते. बऱ्याचदा आपण जेव्हा फणसाचे गरे खरेदी करतो तेव्हा फणस खाल्ल्यानंतर यातील बिया मात्र फेकून दिल्या जातात. तुम्हालाही ही सवय असल्याच वेळीच थांबा. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही फेकत असलेल्या बियांमध्ये पोषकतत्वांचा मोठा साठा आढळला जातो. या बियांचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरु शकते. चला फणसाच्या बियांमध्ये किती व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात तसेच यांचे कशाप्रकारे सेवन केले जाऊ शकते ते जाणून घेऊया.

Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय

फणसाच्या बियांमध्ये, त्याच्या गरासोबतच, व्हिटॅमिन ‘अ’ आणि ‘क’, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण असते. ही सर्व निरोगी शरीर राखण्यासाठी आवश्यक पोषक तत्वे आहेत. हेल्थलाईननुसार १०० ग्रॅम फणसाच्या बियांमध्ये ०.४३ ग्रॅम प्रथिने, १.५ ग्रॅम फायबर, १० ते १७ आययू व्हिटॅमिन ए, ११ मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी, ५० मिलिग्रॅम कॅल्शियम, ५४ मिलिग्रॅम मॅग्नेशियम, १.५ मिलिग्रॅम लोह आणि २६४ मिलिग्रॅम पोटॅशियम असते. तसेच, त्यात बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स, थायमिन आणि रायबोफ्लेविन यांचाही स्रोत असतो. याशिवाय त्यात इतर अनेक संयुगे देखील आढळतात.

बियांना आहारात कसे समाविष्ट करावे?

तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारे फणसाच्या बियांचा आपल्या आहारात समावेश करु शकता. या बियांना भाजून किंवा उकडून खाल्ले जाऊ शकते. शिवाय बियांची सुकी भाजी देखील बनवता येते. अनेकांना ठाऊक नाही पण फणसाच्या बियांपासून चविष्ट लाडू देखील तयार करता येतात. यांना तळून तुम्ही क्रिस्पी स्नॅक्सप्रमाणे याचे सेवन करु शकता.

Dinner Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचल नाही? मग झटपट घरी बनवा मसालेदार ‘सोया पुलाव’

फणसाच्या बियांचे फायदे?

एका अभ्यासानुसार, फणसाच्या बियांचे सेवन वजन कमी करण्यास मदत करते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. यातले रेझिस्टंट स्टार्च रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त फणसाच्या बिया कोलेस्ट्राॅल, ट्रायग्लिसराइड आणि लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासही मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन सी देखील आढळते ज्यामुळे त्वचेचे आरोग्य आणि इम्यूनिटी बूस्ट होण्यास मदत मिळते. या बियांची पावडर दुधात मिसळून चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा ड्राय राहत नाही. यात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सी असल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासही याची मदत मिळते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Jackfruit seeds health benefits nutritional value how to eat and add to daily diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • jackfruit
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Lifestyle Tips : लहान बर्फाचा तुकडा शरीराच्या अनेक आजारांना दूर पळवून लावू शकतो, वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
1

Lifestyle Tips : लहान बर्फाचा तुकडा शरीराच्या अनेक आजारांना दूर पळवून लावू शकतो, वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

मानेवरील काळेपणाने त्रासलात? आजच या 5 घरगुती ट्रिक्सची मदत घ्या, वर्षांनुवर्षांची टॅनिंग होईल दूर
2

मानेवरील काळेपणाने त्रासलात? आजच या 5 घरगुती ट्रिक्सची मदत घ्या, वर्षांनुवर्षांची टॅनिंग होईल दूर

IRCTC :भाविकांसाठी मोठी सुवर्णसंधी! 18 दिवसांत घडणार 11 ज्योतिर्लिंग आणि 3 धामांचे दर्शन; पाहा संपूर्ण शेड्युल आणि तिकिटांचे दर
3

IRCTC :भाविकांसाठी मोठी सुवर्णसंधी! 18 दिवसांत घडणार 11 ज्योतिर्लिंग आणि 3 धामांचे दर्शन; पाहा संपूर्ण शेड्युल आणि तिकिटांचे दर

रोज वापरली जाणारी टॅल्कम पावडर वाढवेल गंभीर आजाराला धोका, वेळीच व्हा सावध; डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला
4

रोज वापरली जाणारी टॅल्कम पावडर वाढवेल गंभीर आजाराला धोका, वेळीच व्हा सावध; डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.