Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Care Tip: धाप लागण्यामागे फिटनेसची कमतरता की फुफ्फुसांचा आजार? जाणून घ्या शरीरसंबंधित आजाराचे संकेत

Health Care Tips: शारीरिक निष्क्रियतेमुळे नव्हे तर फुफ्फुसांशी संबंधित कारणामुळे श्वास लागतोय असे वाटत असल्यास, स्पायरोमेट्री (पल्मनरी फंक्शन टेस्ट) ही साधी तपासणी उपयुक्त ठरू शकते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 26, 2026 | 01:45 PM
Health Care Tip: धाप लागण्यामागे फिटनेसची कमतरता की फुफ्फुसांचा आजार? जाणून घ्या शरीरसंबंधित आजाराचे संकेत

Health Care Tip: धाप लागण्यामागे फिटनेसची कमतरता की फुफ्फुसांचा आजार? जाणून घ्या शरीरसंबंधित आजाराचे संकेत

Follow Us
Follow Us:

Health Care Tip: रुग्ण जेव्हा दैनंदिन कामे किंवा शारीरिक हालचाली करताना दम लागण्याची तक्रार घेऊन माझ्याकडे येतात, तेव्हा त्यांच्या मनात असणारा एक सामान्य प्रश्न असतो, “डॉक्टर, माझा फिटनेस कमी असल्यामुळे मला दम लागतोय की माझ्या फुफ्फुसांमध्ये काही समस्या आहे?” हा संभ्रम होणे स्वाभाविक आहे. शारीरिक तंदुरुस्ती कमी असणे तसेच अस्थमा, सीओपीडी किंवा ब्रॉन्कायटिससारख्या फुफ्फुसांच्या आजारांमुळेही श्वास लागण्याचा त्रास होऊ शकतो. मात्र, या दोन्ही परिस्थितींमध्ये शरीराकडून मिळणारे संकेत वेगवेगळे असतात.याविषयी डॉ. महावीर मोदी,कन्सल्टंट पल्मोनोलॉजिस्ट आणि चेस्ट फिजिशियन, रुबी हॉल क्लिनिक, पुणे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

Dj Sound: डीजेच्या कर्कश आवाजाचा हृदयाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो? हार्ट अटॅक येण्याआधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

श्वास पूर्ववत होण्यासाठी लागणारा वेळ

फिटनेस कमी असल्यास: शारीरिक हालचाल थांबवून विश्रांती घेतल्यानंतर साधारण २ ते ५ मिनिटांत श्वासोच्छवास सामान्य होतो.

फुफ्फुसांचा आजार असल्यास: विश्रांती घेतल्यानंतरही दम लागण्याची भावना कायम राहू शकते आणि श्वास सामान्य होण्यासाठी १० ते १५ मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो.

व्यायाम केल्यानंतर शरीराची प्रतिक्रिया कशी असते?

फिटनेस कमी असल्यास: नियमित चालण्यास सुरुवात केल्यानंतर २ ते ३ आठवड्यांत ऊर्जा आणि शारीरिक क्षमता सुधारू लागते. पूर्वीपेक्षा जास्त वेळ चालल्यानंतर दम लागतो.

फुफ्फुसांचा आजार असल्यास: व्यायाम केल्याने त्रास कमी होण्याऐवजी कायम राहू शकतो. स्वतःला जास्त ताण दिल्यास खोकला, छातीत घट्टपणा किंवा श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ शकतो.

इतर लक्षणांकडेही लक्ष द्या

फिटनेस कमी असल्यास: दम लागणे, पाय थकणे आणि सामान्य थकवा जाणवू शकतो; मात्र श्वास घेताना घरघर किंवा सतत खोकला सहसा जाणवत नाही. फुफ्फुसांचा आजार असल्यास: श्वास घेताना घरघर होणे, सतत कोरडा किंवा कफासह खोकला, छातीत घट्टपणा किंवा कफ यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

शरीराची स्थिती आणि दैनंदिन कामांमुळे होणारा त्रास

फिटनेस कमी असल्यास: तीन मजले जिने चढणे, बस पकडण्यासाठी धावणे यांसारख्या अधिक शारीरिक मेहनतीच्या कामांमध्ये दम लागू शकतो. बसल्यावर किंवा झोपल्यावर यामध्ये विशेष फरक जाणवत नाही. फुफ्फुसांचा आजार असल्यास: बूटाची लेस बांधणे, बेड तयार करणे किंवा बोलणे यांसारख्या अगदी साध्या कामांमध्येही दम लागू शकतो. पाठीवर सरळ झोपल्यावर श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ शकतो.

धोक्याची लक्षणे

श्वास लागण्यासोबत खालीलपैकी कोणतेही लक्षण जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी:

रात्री अचानक जाग येऊन श्वास घेण्यास त्रास होणे.
पाय, घोटे किंवा पायांच्या खालच्या भागाला सूज येणे.
ओठ किंवा नखांचा रंग निळसर होणे.
छातीत दडपण किंवा दबाव जाणवणे.
श्वास घेण्यासाठी मध्येच थांबावे लागत असल्याने पूर्ण वाक्य बोलता न येणे.

पुढील पाऊल

तुम्हाला शारीरिक निष्क्रियतेमुळे नव्हे तर फुफ्फुसांशी संबंधित कारणामुळे श्वास लागतोय असे वाटत असल्यास, स्पायरोमेट्री (पल्मनरी फंक्शन टेस्ट) ही साधी तपासणी उपयुक्त ठरू शकते. या तपासणीत फुफ्फुसांमध्ये किती हवा धरली जाऊ शकते आणि ती किती वेगाने बाहेर सोडता येते हे तपासले जाते. त्यामुळे श्वास लागण्यामागचे खरे कारण शोधण्यास मदत होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: फिटनेस कमी असल्यामुळे धाप का लागू शकते?

    Ans: शारीरिक तंदुरुस्ती कमी असल्यास चालणे, धावणे किंवा व्यायाम करताना शरीराला जास्त ऑक्सिजनची गरज भासू शकते आणि त्यामुळे धाप लागू शकते.

  • Que: फुफ्फुसांच्या आजारामुळे होणारी धाप कशी ओळखावी?

    Ans: धाप वारंवार लागणे, कमी हालचालीतही श्वास घेण्यास त्रास होणे, सतत खोकला, घरघर किंवा छातीत जडपणा अशी लक्षणे असल्यास फुफ्फुसांशी संबंधित कारणांचा विचार करणे आवश्यक आहे.

  • Que: व्यायाम करताना धाप लागणे सामान्य आहे का?

    Ans: जोरदार व्यायाम करताना काही प्रमाणात श्वास वाढणे सामान्य असू शकते. मात्र धाप खूप जास्त लागणे, नेहमीच्या हालचालींमध्येही होणे किंवा त्यासोबत इतर लक्षणे दिसणे दुर्लक्षित करू नये.

Web Title: Health care tip is breathlessness due to low fitness or lung disease know the warning signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Doctor advice
  • health care news
  • health issue

संबंधित बातम्या

Postpartum Weight Loss: प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करताय? सावधान! ‘या’ आहारावर अधिक द्या भर
1

Postpartum Weight Loss: प्रसूतीनंतर लगेच वजन कमी करताय? सावधान! ‘या’ आहारावर अधिक द्या भर

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली
2

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
3

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.