Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Care: कोणताही त्रास होत नसताना सुद्धा ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल तपासणे का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या यामागील कारणे

Health Care: तितकंच महत्त्वाचं म्हणजे, डॉक्टरांशी चर्चा न करता औषधं स्वतःहून बंद करू नयेत किंवा केवळ आहार आणि व्यायामाच्या मदतीने आजार नियंत्रणात ठेवता येईल असं गृहीत धरू नये. कोणतीही लक्षणं जाणवत नसली, तरी दरवर्षी नियमित आरोग्य तपासणी करून घेण्याची सवय लावा.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 02, 2026 | 01:33 PM
कोणताही त्रास होत नसताना सुद्धा ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल तपासणे का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या यामागील कारणे

कोणताही त्रास होत नसताना सुद्धा ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल तपासणे का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या यामागील कारणे

Follow Us
Follow Us:

Health Care: तुमचा आहार बऱ्यापैकी संतुलित आहे, तुम्ही रोजची कामं व्यवस्थित करता आणि तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही तक्रार नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की तुमच्या आरोग्याबाबत काळजी करण्यासारखं काहीच नाही. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं आणि कोलेस्टेरॉलची पातळी बिघडणं या गोष्टी अनेक वर्षं कोणतीही ठळक लक्षणं न दाखवता हळूहळू आरोग्यावर परिणाम करू शकतात. जेव्हा यांची लक्षणं दिसू लागतात, तेव्हा शरीराचं काही प्रमाणात नुकसान आधीच झालेलं असू शकतं. याविषयी डॉ. मधुरा जोगवार, लॅब चीफ, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड (मुंबई) यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

Health Update: लघवीच्या नमुन्यातून मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान! नव्या चाचणीमुळे वैद्यकीय क्षेत्रात आशादायक चित्र

29 ऑक्टोबर रोजी जागतिक स्ट्रोक दिन (World Stroke Day) साजरा करताना, आपल्या आरोग्यावर शांतपणे परिणाम करणाऱ्या दोन महत्त्वाच्या घटकांबद्दल म्हणजेच रक्तातील वाढलेली साखर आणि वाढलेलं कोलेस्टेरॉल याबद्दल जनजागृती करणं गरजेचं आहे. आपण पूर्णपणे निरोगी असल्याचं वाटत असतानाही या दोन्ही गोष्टी नियंत्रणात ठेवणं का महत्त्वाचं आहे, हे समजून घेणंही तितकंच आवश्यक आहे.

वाढलेली साखर आणि कोलेस्टेरॉलबद्दल जनजागृती:

ब्लड शुगर म्हणजेच रक्तातील ग्लुकोज हा शरीराला ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. स्वादुपिंडातून (Pancreas) तयार होणारं इन्सुलिन हे हार्मोन ग्लुकोजला शरीरातील पेशींमध्ये पोहोचण्यास मदत करतं. जेव्हा इन्सुलिन योग्य प्रकारे काम करत नाही किंवा शरीरात पुरेसं इन्सुलिन तयार होत नाही, तेव्हा रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं आणि हळूहळू मधुमेह म्हणजेच डायबेटीस होऊ शकतो. ही प्रक्रिया हळूहळू घडते. एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखर अनेक महिने किंवा अगदी वर्षभर वाढलेली असू शकते, तरीही तिला डायबेटीसची नेहमी दिसणारी लक्षणं जाणवतीलच असं नाही. त्याचप्रमाणे, प्री-डायबेटीस म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण सामान्यपेक्षा जास्त असतं, पण ते अजून डायबेटीसच्या पातळीपर्यंत पोहोचलेलं नसतं. योग्य तपासणी केली नाही, तर ही स्थितीही अनेकदा लक्षात येत नाही.

कोलेस्टेरॉल हा शरीरातील एक प्रकारचा चरबीयुक्त पदार्थ आहे. शरीरातील पेशी तयार करण्यासाठी आणि काही हार्मोन्सच्या निर्मितीसाठी त्याची गरज असते. मात्र, LDL कोलेस्टेरॉल म्हणजेच सामान्य भाषेत ज्याला ‘वाईट कोलेस्टेरॉल’ म्हणतात, त्याचं प्रमाण जास्त झाल्यास ते रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर जमा होऊ लागतं. यामुळे प्लाक्स (Plaques) नावाचे थर तयार होतात. कालांतराने हे थर रक्तवाहिन्या अरुंद करतात आणि त्यांची लवचिकताही कमी करतात.

स्ट्रोकशी याचा संबंध कसा आहे?

स्ट्रोक म्हणजेच मेंदूचा झटका दोन प्रकारे येऊ शकतो. पहिल्या प्रकारात मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी ब्लॉक होते आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही. याला इस्केमिक स्ट्रोक (Ischaemic Stroke) म्हणतात. दुसऱ्या प्रकारात मेंदूतील एखादी रक्तवाहिनी फुटते आणि मेंदूमध्ये किंवा मेंदूच्या आसपास रक्तस्राव होतो. याला हॅमरेजिक स्ट्रोक (Haemorrhagic Stroke) म्हणतात.

LDL कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक्स तयार होण्यास मदत होते. हे प्लाक्स रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करू शकतात आणि त्यामुळे इस्केमिक स्ट्रोकचा धोका वाढतो. डायबेटीसमुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. म्हणजेच रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणावर परिणाम होतो, शरीरातील सूज किंवा दाह (Inflammation) वाढतो आणि अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस (Atherosclerosis) ही प्रक्रिया वेगाने होऊ शकते. अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये हळूहळू चरबीयुक्त थर जमा होऊन त्या अरुंद होण्याची प्रक्रिया. उच्च रक्तदाब हा रक्तस्रावामुळे होणाऱ्या स्ट्रोकचा एक मोठा धोकादायक घटक आहे. याशिवाय, डायबेटीसमुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या इतर आजारांचाही धोका वाढतो.

रक्तातील साखर वाढलेली असणं आणि कोलेस्टेरॉलची पातळी बिघडलेली असणं, यासोबतच उच्च रक्तदाब, धूम्रपान, शारीरिक हालचालींचा अभाव किंवा शरीराचं वाढलेलं वजन असेल, तर धोका आणखी वाढतो. हे सर्व घटक एकमेकांचा परिणाम वाढवण्याचं काम करतात.अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (US Centers for Disease Control and Prevention) यांच्या माहितीनुसार, डायबेटीस असलेल्या व्यक्तींना हृदयविकार होण्याची किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता इतरांच्या तुलनेत जवळपास दुप्पट असते.एक साधी रक्त तपासणीही महत्त्वाचा फरक घडवू शकते. चांगली गोष्ट म्हणजे, या समस्या ओळखण्यासाठी फार गुंतागुंतीच्या तपासण्यांची गरज नसते.

ब्लड ग्लुकोज टेस्टमुळे रक्तातील साखरेची सध्याची पातळी समजते. HbA1c टेस्टमुळे मागील साधारण दोन ते तीन महिन्यांतील रक्तातील साखरेची सरासरी पातळी कळते. लिपिड प्रोफाइल (Lipid Profile) या तपासणीत एकूण कोलेस्टेरॉल, LDL कोलेस्टेरॉल, HDL कोलेस्टेरॉल (ज्याला अनेकदा ‘चांगलं कोलेस्टेरॉल’ म्हणतात) आणि ट्रायग्लिसराइड्स म्हणजेच रक्तातील चरबीचा आणखी एक प्रकार, यांचं प्रमाण समजतं.

Apo A, Apo B आणि Lipoprotein(a) या काही विशेष लिपिडशी संबंधित तपासण्या आहेत. नियमित लिपिड प्रोफाइलपेक्षा अधिक माहिती देऊन हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका समजून घेण्यास या तपासण्या मदत करतात. विशेषतः डायबेटीस असलेल्या व्यक्ती, कमी वयात हृदयविकार झालेल्या व्यक्ती किंवा कुटुंबात हार्ट अटॅक अथवा स्ट्रोकचा ठोस इतिहास असलेल्या व्यक्तींसाठी या तपासण्या उपयुक्त ठरू शकतात.

तुमचं वय, कौटुंबिक वैद्यकीय इतिहास, वजन, रक्तदाब आणि इतर धोकादायक घटक लक्षात घेऊन कोणत्या तपासण्या कराव्यात आणि त्या किती वेळाने पुन्हा कराव्यात, याबाबत तुमचे डॉक्टर योग्य सल्ला देऊ शकतात. तपासणीमध्ये कोणताही रिपोर्ट असामान्य आला, तर त्याचा रुग्णाच्या एकूण आरोग्यस्थितीशी संबंध जोडून विचार करणं आवश्यक असतं. तसेच, उपचारांबाबतचे निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत.

आपल्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या जीवनशैलीतील छोट्या-छोट्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. भाज्या, फळं, संपूर्ण धान्य, डाळी आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा. साखरयुक्त पेये, अतिप्रक्रिया केलेले पदार्थ आणि जास्त मीठ असलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात खावेत. आपल्या आरोग्याला झेपेल अशा प्रकारे दर आठवड्याला काही प्रमाणात मध्यम स्वरूपाचा व्यायाम करावा. यामध्ये वेगाने चालणं, पोहणं किंवा सायकल चालवणं यांचा समावेश होऊ शकतो. तंबाखू आणि धूम्रपानापासून दूर राहावं, मद्यपान मर्यादित ठेवावं, वजन नियंत्रणात ठेवावं आणि डॉक्टरांनी दिलेली औषधं नियमित घ्यावीत.

शेवटी, स्ट्रोकची धोक्याची लक्षणं ओळखणंही खूप महत्त्वाचं आहे. अचानक चेहरा एका बाजूला वाकडा होणं, हात किंवा पायामध्ये अशक्तपणा किंवा बधिरपणा जाणवणं, बोलताना अडचण येणं, शरीराचा तोल जाणं किंवा अचानक दृष्टीमध्ये बदल होणं, ही स्ट्रोकची प्रमुख लक्षणं आहेत. यापैकी कोणतंही लक्षण जाणवल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

स्ट्रोकच्या उपचारांमध्ये ‘गोल्डन अवर’ म्हणजेच सुरुवातीचा महत्त्वाचा वेळ खूप निर्णायक असतो. कारण वेळ म्हणजेच मेंदू! उपचारासाठी होणाऱ्या प्रत्येक मिनिटाच्या विलंबामुळे मेंदूतील आणखी पेशी नष्ट होऊ शकतात. त्यामुळे स्ट्रोकची लक्षणं वेळीच ओळखून तातडीने स्ट्रोकच्या उपचारांची सुविधा असलेल्या रुग्णालयात पोहोचणं रुग्णाच्या आयुष्यात मोठा फरक घडवू शकतं.

Stomach Pain: पोटाच्या एकाच बाजूला कायम वेदना होतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय

या जागतिक स्ट्रोक दिनानिमित्त स्वतःला एक साधं वचन द्या: आरोग्याची काळजी घेण्यासाठी आजाराची लक्षणं दिसण्याची वाट पाहू नका. आवश्यक त्या आरोग्य तपासण्या वेळेवर करून घ्या आणि रिपोर्ट्समध्ये काही बदल आढळल्यास त्यानुसार योग्य पावलं उचला. आज प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी दिलेली काही मिनिटं उद्या तुमचं आरोग्य, जीवनमान आणि भविष्य सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणताही त्रास नसतानाही ब्लड शुगर तपासणे का महत्त्वाचे आहे?

    Ans: मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे नियमित ब्लड शुगर तपासणी केल्यास रक्तातील साखरेची वाढ वेळीच ओळखता येते.

  • Que: कोलेस्टेरॉल वाढल्याची लक्षणे शरीरावर दिसतात का?

    Ans: बहुतेक वेळा कोलेस्टेरॉल वाढल्याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे लिपिड प्रोफाइल रक्त तपासणीद्वारे कोलेस्टेरॉलचे प्रमाण तपासणे महत्त्वाचे आहे.

  • Que: ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल तपासणी किती वेळा करावी?

    Ans: तपासणीची वारंवारता वय, कौटुंबिक इतिहास, वजन आणि इतर आरोग्यविषयक जोखमींवर अवलंबून असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करावी.

Web Title: Health care why is it important to get your blood sugar and cholesterol checked even when you have no symptoms sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 01:33 PM

Topics:  

  • brain
  • Health Care Tips
  • Stroke

संबंधित बातम्या

Stomach Pain: पोटाच्या एकाच बाजूला कायम वेदना होतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय
1

Stomach Pain: पोटाच्या एकाच बाजूला कायम वेदना होतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय

Liver Damage: लिव्हरसबंधित आजाराच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, हलक्यात घेणे पडेल शरीरासाठी महागात
2

Liver Damage: लिव्हरसबंधित आजाराच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, हलक्यात घेणे पडेल शरीरासाठी महागात

रात्री झोपण्याआधी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरात दिसून येतील आश्चर्यकारक बदल, पचनक्रिया राहील निरोगी
3

रात्री झोपण्याआधी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरात दिसून येतील आश्चर्यकारक बदल, पचनक्रिया राहील निरोगी

Health Care: थोडस पाणी प्यायल्यानंतर सुद्धा लगेच लघवीला जावे लागते? शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर किती पाणी प्यावे
4

Health Care: थोडस पाणी प्यायल्यानंतर सुद्धा लगेच लघवीला जावे लागते? शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर किती पाणी प्यावे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.