
पोटाच्या एकाच बाजूला कायम वेदना होतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय
पोटाच्या एका बाजूला कशामुळे वेदना होतात?
मुतखडा होण्याची कारणे?
गॅस अपचनामुळे पोटाच्या कोणत्या बाजूला दुखते?
Stomach Pain: पोटात वेदना होण्यास सुरुवात झाल्यानंतर बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. अपचन, पित्त, गॅस किंवा पचनाच्या समस्या वाढल्यानंतर पोटात वेदना होतात. पण काहीवेळा संपूर्ण पोटात वेदना न होता एकाच कोपऱ्यात वेदना होतात. पोटात काहीतरी टोचल्यासारखे वाटते, पोट ताणल्यासारखे किंवा ओढल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे पोटात वाढलेल्या वेदनांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. जेवल्यानंतर किंवा अचानक कोणत्याही वेळी पोटात तीव्र कळा किंवा वेदना जाणवू लागतात. चला तर जाणून घेऊया पोटाच्या उजव्या आणि डाव्या कुशीत कोणत्या कारणांमुळे वेदना आणि त्यावरील उपाय.(फोटो सौजन्य – istock)
दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. तिखट, तेलकट किंवा शिळे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे अपचनाच्या समस्या वाढू लागतात. आतड्यांमध्ये अडकलेल्या गॅसमुळे पोटाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला कळ येऊन वेदना होतात. याशिवाय काहीवेळा पोट फुगल्यासारखे वाटते. एकाच ठिकाणी पोटात टोचल्यासारख्या वेदना सुद्धा जाणवतात. वारंवार ढेकर, पोटात गुडगुडणे आणि पोटात जडपणा जाणवत असेल तर गरम पाणी प्यावे किंवा कोमट पाण्यात जिऱ्याची पावडर मिक्स करून प्यावी. यामुळे आतड्यांमध्ये अडकलेला गॅस बाहेर पडून जाण्यास मदत होईल.
आतड्यांमधील मल बाहेर पडून न गेल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास पोटाच्या खालच्या भागात एका बाजूला वेदना किंवा कळ मारतात. पोट फुगणे, शौचाला जोर लावावा लागणे आणि पोटात दाब जाणवणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. वाढत्या बद्धकोष्ठतेकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. याशिवाय बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश, भरपूर पाणी प्यावे.
पोटाच्या उजव्या खालच्या बाजूला अचानक किंवा हळूहळू वाढणाऱ्या वेदना अपेंडिसायटिसची लक्षणे असू शकतात. याची सुरुवात नाभीपासून होते. नाभीच्या आसपास वेदना होणे, त्यानंतर वेदना उजव्या खालच्या बाजूला सरकू शकतात. याशिवाय चालताना, खोकताना संबंधित भागावर दाब पडल्यास वेदना जाणवू लागतात. मळमळ, उलट्या आणि ताप इत्यादी लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.
पोटात किडनी स्टोन तयार झाल्यानंतर पोटाच्या एका बाजूला वेदना होतात. या वेदना कालांतराने कंबरेच्या खाली सुद्धा जातात. मुतखडा झाल्यानंतर अचानक अधून मधून पोटात वेदना होतात. लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवीला जाणे, मळमळ किंवा लघवीत रक्त दिसणे इत्यादी लक्षणे दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे मुतखडा होऊ नये म्हणून नियमित भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
Ans: पोटाच्या एकाच बाजूला सतत वेदना होण्यामागे गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, किडनी स्टोन, अपेंडिक्सचा त्रास किंवा आतड्यांसंबंधित समस्या अशी विविध कारणे असू शकतात.
Ans: पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होण्यामागे अपेंडिसायटिस, पित्ताशयातील खडे, यकृताशी संबंधित समस्या किंवा किडनी स्टोन ही कारणे असू शकतात.
Ans: गॅस, बद्धकोष्ठता, आतड्यांचा संसर्ग, डायव्हर्टिक्युलायटिस किंवा किडनी स्टोन यांमुळे पोटाच्या डाव्या बाजूला वेदना होऊ शकतात.