Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Alert: संध्याकाळी 7 नंतर चुकूनही करु नका ‘हे’ काम, हृदयावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Bad Habits : संध्याकाळी ७ नंतर शरीर विश्रांतीच्या स्थितीत जाते ज्यामुळे यानंतर केलेल्या काही चूका तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करत असतात. याचा प्रामुख्याने झोपेच्या गुणवत्तेवर आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो.

  • By नुपूर भगत
Updated On: May 15, 2026 | 11:15 AM
Health Alert: संध्याकाळी 7 नंतर चुकूनही करु नका 'हे' काम, हृदयावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Health Alert: संध्याकाळी 7 नंतर चुकूनही करु नका 'हे' काम, हृदयावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Follow Us
Follow Us:
  • संध्याकाळी ७ नंतर हेवी डिनर आणि लेट नाइट स्नॅकिंग केल्याने हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो.
  • रात्री उशिरा कॉफी किंवा मद्यपान केल्याने झोप, ब्लड प्रेशर आणि हार्ट रेटवर वाईट परिणाम होतो.
  • सततचा तणाव आणि चुकीची रात्रीची जीवनशैली हृदयविकाराचा धोका वाढवू शकते.
दिवसेंदिवस आजारांचा धोका अनेक पटींनी वाढला आहे. रोजच्या जीवनातील काही चुकांमुळे आता लोक वृद्धापळात नाही तर तरुणपणातच आपला जीव गमावत आहेत. या आरोग्य धोक्यांपासून स्वत:ला जर वाचवायचे असेल तर जीवनशैलीत आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये काही प्रमुख बदल करणे महत्त्वाचे ठरते. फार कमी लोकांना हे ठाऊक आहे की, ८ नंतर केल्या जाणाऱ्या काही क्षुल्ल्क चुका आपल्या डाएट प्लॅनवर आणि हेल्थवर परिणाम करत असतात.

आता पर्यटनासाठी करा गावाची सफर! शिवरायांपासून ज्ञानोबापर्यंत या गावात आहे अनेक ऐतिहासिक गोष्टींचा साठा…

तज्ञांच्या मते, संध्याकाळी ७ नंतर शरीराची जैविक लय (circadian rhythm) विश्रांतीच्या टप्प्यात पोहचते. यानंतर ब्लड प्रेशर, हार्ट रेट आणि मेटाबॉलिक एक्टिव्हिटी देखील मंदावू लागते. शरीराची ही लय बिघडल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित प्रणालींवर ताण पडू शकतो. हे लक्षात घ्या की, इथे आपण दिवसा केल्या जाणाऱ्या एक्टिव्हिटिजविषयी बोलत नाही आहोत तर संध्याकाळनंतर जेव्हा शरीर विश्रांती घेण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा केल्या जाणाऱ्या एक्टिव्हिटिजविषयी बोलत आहोत. संध्याकाळी आपल्याद्वारे केल्या जाणाऱ्या काही चुका हळूहळू आपल्या शरीराला गंभीर आरोग्य समस्यांजवळ घेऊन जात असते. यात हाय ब्लड प्रेशर आणि हृदयासंबंधित आजारांचा समावेश आहे.

हेवी डिनर

जर तुम्ही संपूर्ण दिवसातून रात्रीच्या वेळी जड आणि भरपेट अन्नाचे सेवन करत असाल तर तुमची ही सवय चुकीची आहे. रात्रीच्या वेळी हेवी डिनर केल्याने शरीराच्या पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊ लागतो. रात्रीच्या वेळी पचनक्रिया मंदावलेली असते ज्यामुळे याकाळात जड अन्नपदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. रक्ताभिसरण पचनावर केंद्रित असल्याने हृदयाला रक्त पंप करण्यास अडचण निर्माण होते. यामुळे रक्तवाहिन्यांच्या नियंत्रणावरही परिणाम होऊ लागतो.

संध्याकाळनंतर काॅफीचे सेवन

ऑफिसमध्ये किंवा ऑफिसवरुन घरी आल्यानंतर जर तुम्ही काॅफीचे सेवन करत असाल तर ही सवय आजच थांबवा. काॅफीतील कॅफीन हा पदार्थ मज्जासंस्थेला उत्तेजित करतो ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढू लागतात. यामुळे लवकर झोप देखील येत नाही परिणामी स्लिप सायकलवर याचा परिणाम होऊ लागतो. स्लिप सायकल बिघडल्याने हायपरटेंशनची समस्या निर्माण होते.

लेट नाइट स्नॅकिंग

तरुणांमध्ये लेट नाइट स्नॅकिंगचे प्रमाण वाढत आहे. उशीरा रात्रीपर्यंत चित्रपट पाहताना भूक लागते ज्यासाठी स्नॅक्स खाण्याचा निर्णय घेतला जातो. यात अधिकतरवेळी नूडल्य, चिप्स, चिवडा अशा तळलेल्या पदार्थांचा समावेश केला जातो. हे पदार्थ शरीरात साखरेची आणि कोलेस्ट्राॅलची पातळी अनेक पटींने वाढवत असते ज्यामुळे आरोग्यावर याचा वाईट परिणाम होऊ लागतो. ही सवय कालांतराने हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर परिणाम करु लागते.

ऑफिस स्ट्रेस

कामाच्या जागी तणावाचे वातावरण जास्त असते, पण तणावाचा आपल्या शरीरावर परिणाम होता कामा नये. दिवसभरातील काॅल्स, कामाचे टेंन्शन याचा फार विचार केलात तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सततचा ताणतणाव शरीरातील स्ट्रेस लेव्हल वाढवते ज्याचा पुढे जाऊन हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो.

उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि जीव मृत्यूच्या पिंजऱ्यात अडकणार… जाणून घ्या किती धोकादायक आहे नोरो व्हायरस

मद्यपानाचे सेवन

अनेकांना तणाव दूर करण्यासाठी किंवा पार्टी करण्यासाठी मद्यपानाचे सेवन करण्याची सवय आहे. ही सवय आपल्या आरोग्यासाठी घातक ठरत असते याची माहिती तर सर्वांनाच आहे. अनेकांना अस वाटतं की कमी प्रमाणात अल्कहोलचे सेवन केल्याने आरोग्याला हानी पोहचत नाही. पण असं नाहीये, मद्यपान हृदयाच्या लय बिघडवत असते. यामुळे ब्लड प्रेशर वाढते आणि झोपेच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होऊ लागतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Health tips avoid heavy dinner coffee and late night snacking after 7 pm to protect heart health marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 11:14 AM

Topics:  

  • Health Tips
  • Heart attack prevention
  • lifestyle news

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
2

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
3

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
4

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.