रिकाम्या पोटी फळे खाण्याचे फायदे आणि तोटे:
फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. रोजच्या आहारात हंगामी फळांचे सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. मात्र अजूनही नेमकं कोणत्या वेळी फळांचे सेवन करावे किंवा कोणत्या वेळी फळांचे सेवन करू नये? यामध्ये अनेक समज गैरसमज आहेत. अनेक लोक सकाळी रिकाम्या पोटी फळे खाणे फायद्याचे मानतात कारण रिकाम्या पोटी फळे खाल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि आरोग्य सुधारते. तर काहींच्या मते दुपारच्या वेळी फळे खाणे योग्य आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला कोणत्या वेळी फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कायमचा होईल गायब! आहारात ‘या’ मसाल्याच्या पदार्थाचे सेवन, पोट राहील स्वच्छ
प्रत्येक फळांमध्ये वेगवेगळे पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे त्यांच्या सेवनामुळे आरोग्याला फायदेसुद्धा होतात आणि तोटेसुद्धा होतात. चुकीच्या वेळी फळांचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात फळांचे सेवन करताना शरीराला पचन होणाऱ्याचं फळांचे सेवन करावे. पचनसंस्था बिघडल्यानंतर संपूर्ण शरीरालाच हानी पोहचते.
वाढलेले वजन कमी करताना किंवा इतर वेळी आरोग्य सुधारण्यासाठी फळांचे सेवन करावे. फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी फळांचे सेवन करावे. केळी, सफरचंद, संत्री इत्यादी फळांचे सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच आरोग्य सुधारते. नियमित २ केळी खाल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारते. मात्र या पोटी रिकाम्या पोटी आंबट फळांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते.
दुपारच्या जेवणाआधी किंवा जेवणानंतर अनेक लोक फळे खाण्याचा सल्ला देतात. दुपारच्या जेवणाआधी फळांचे सेवन केल्यामुळे भूक नियंत्रणात राहते. जास्त भूक लागत नाही. त्यामुळे वाढलेल्या वजनाने त्रस्त असलेली लोकांनी दुपारच्या जेवणाआधी फळांचे सेवन करावे. दुपारच्या वेळी शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होऊन जाते, अशावेळी शरीरातील ऊर्जा कायम टिकवून ठेवण्यासाठी फळांचे सेवन करावे. मात्र दुपारच्या जेवणानंतर फळांचे सेवन केल्यामुळे पोटासंबंधित समस्या किंवा पचनक्रिया बिघडू शकते.
संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं छोटी मोठी भूक लागते. अशावेळी अनेक लोक बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थ आणून खातात. मात्र नेहमी नेहमी तिखट पदार्थ खाण्याऐवजी फळांचे सेवन करावे. फळांचे सेवन केल्यामुळे शरीर ताजेतवाने राहते. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात सफरचंद, पपई, केळी, बेरीज, द्राक्ष इत्यादी पौष्टिक फळांचे सेवन करावे. या फळांच्या सेवनामुळे पचनक्रिया निरोगी राहते.