प्रिमॅच्युअर बाळाची काळजी थंडीत कशी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)
हिवाळ्यात थंडीमुळे अकाली जन्मलेल्या बाळांना सर्दी, खोकला, न्यूमोनिया यांसारख्या श्वसनविकारांचा धोका असतो. यासोबतच शरीराचे तापमान कमी होणे (हायपोथर्मिया) सारखी गंभीर समस्या उद्भवू शकते. त्यामुळे बाळाला योग्य उब मिळेल याची काळजी घेणे गरजेचे महत्त्वाचे आहे. डॉ. बॉबी सदावर्ती, बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ, ॲलर्जिस्ट आणि स्तनपान तज्ज्ञ, एम्स हॉस्पिटल, डोंबिवली यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे, जाणून घेऊया.
पालकांसाठी मोठी चिंतेची बाब
केवळ प्रौढांनाच नाही, तर अकाली जन्मलेल्या बाळांनाही हिवाळ्यात आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. अकाली जन्मलेली बाळे ३७ आठवड्यांच्या गर्भधारणेपूर्वी जन्माला येतात आणि त्यांचे अवयव व रोगप्रतिकारक प्रणाली पूर्णपणे विकसित झालेली नसते. हिवाळ्यात, तापमानातील घट आणि संसर्गातील वाढ यामुळे या बाळांना अधिक धोका असतो. या बाळांना ॲलर्जी, त्वचेच्या समस्या आणि सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास यांसारख्या श्वसनविकारांचाही त्रास होऊ शकतो. हे नवीन पालकांसाठी चिंताजनक ठरु शकते.
वय फक्त 23 आठवडे, वजन 550 ग्रॅम; बाळाची मृत्यूशी झुंज, 100 दिवस ICU मध्ये उपाय अन्…
अकाली जन्मलेल्या बाळांमधील हिवाळ्यातील सामान्य समस्या
हिवाळ्याच्या काळात अकाली जन्मलेल्या बाळांना अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ही बाळे खूप नाजूक असतात, कारण त्यांच्या शरीरावर चरबी कमी असते आणि त्वचा पातळ असते. त्यामुळे या बाळांना लवकर थंडी वाजते. अगदी थोडा वेळ थंड हवेत गेल्यासही त्यांच्या शरीराचे तापमान अचानक कमी होऊ शकते.
थंड हवा अकाली बाळांच्या नाजूक श्वसनमार्गांना त्रास देऊ शकते. त्यामुळे ब्रॉन्किओलायटिस, सर्दी, फ्लू, न्यूमोनिया आणि रेस्पिरेटरी सिंशियल व्हायरस (RSV) यांसारख्या श्वसनविकारांचा धोका अधिक वाढतो. याशिवाय हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, त्वचेला भेगा पडू शकतात आणि त्यामुळे त्वचेच्या संसर्गाची शक्यता देखील वाढते.
वेळेच्या अगोदरच होतेय गर्भधारणा! भारतात हा प्रकार वाढीस का? जाणून घ्या
बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स
Ans: 9 महिन्याच्या आत साधारण 7 व्या महिन्यात जन्म झालेल्या बाळाला प्रिमॅच्युअर बाळ म्हणतात
Ans: 2 महिने आधी जन्माला आल्यामुळे या बाळांना खूपच जपावं लागतं आणि त्यांची विशेष आणि अधिक काळजी घ्यावी लागते
Ans: या बाळांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने कोणताही आजार त्यांना पटकन होऊ शकतो. ताप, सर्दी अथवा खोकलाही लवकर होऊ शकतो. त्यामुळे त्यांची अधिक चांगल्या पद्धतीने काळजी घ्यावी लागते






