Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चटपटीत चव ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर, पुदिना मखाने कधी खाल्ले आहेत का? जाणून घ्या रेसिपी

Pudina Makhane Recipe : मखाने लो कॅलरी, ग्लुटेन-फ्री आणि प्रोटीनयुक्त आहेत तर पुदिना पचनाला मदत करतो. तुम्हाला हेल्दी पण चटपटीत असं काही खायचं असल्यास ही रेसिपी तुमच्यासाठी एक परिपूर्ण पर्याय आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 26, 2025 | 03:40 PM
चटपटीत चव ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर, पुदिना मखाने कधी खाल्ले आहेत का? जाणून घ्या रेसिपी

चटपटीत चव ठरेल आरोग्यासाठी फायदेशीर, पुदिना मखाने कधी खाल्ले आहेत का? जाणून घ्या रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:
  • मखान्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह यांसारखी आवश्यक पोषक तत्वे आढळतात
  • मखान्यांना चटपटीत चव देण्यासाठी तुम्ही पुदिना मखाने तयार करू शकता
  • पार्टी स्नॅक्ससाठी अथवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही एक परिपूर्ण रेसिपी आहे
आपल्या भारतीय स्वयंपाकघरात एक गोष्ट नेहमी जाणवते. स्नॅक म्हटले की आपल्याला काहीतरी कुरकुरीत, मसालेदार आणि तोंडाला पाणी सुटेल असं हवं असतं. आधुनिक जीवनशैलीत आपण सगळेच आरोग्याबद्दल जागरूक झालो असलो तरी, चव या गोष्टीवर कोणताच तडजोड करायला तयार नसतो. अशाच वेळी मखाने एक अद्भुत पर्याय ठरतात. पण मखाने कितीही आरोग्यदायी असले तरी साधे भाजलेले मखाने रोजचे रोज खाणे कंटाळवाणे होऊ शकते. म्हणूनच आज तुम्हाला आपण देत आहोत एक अगदी खास, सुगंधी आणि ताजेपणाने भरलेला प्रकार म्हणजे पुदिना मखाने.

Recipe : रेस्टॉरंटसारखी चमचमीत ग्रेव्ही आता घरीच बनवा, व्हेज-नॉनव्हेज कोणत्याही भाजीत करता येईल वापर

ताज्या पुदिन्याचा सुगंध, थोडासा तिखटपणा आणि कुरकुरीत मखाने यांचा मेळ तुमच्या चविकोरांना एक वेगळाच आनंद देणार आहे. हे स्नॅक इतके हलके आहे की उपवासातही खाता येते, जेवणानंतर हलकेसे काही हवे असतानाही उत्तम, तसेच मुलांना देण्यासाठीही योग्य. विशेष म्हणजे, हे तयार करण्यासाठी अत्यंत कमी वेळ लागतो, होय, फक्त काही मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी टी टाईम स्नॅक्स, ऑफिस ब्रेक, ट्रॅव्हल स्नॅक सर्वत्र परफेक्ट फिट होतो.

 साहित्य 

  • मखाने – २ कप
  • ताजा पुदिना – ½ कप
  • हिरवी मिरची – १ (ऑप्शनल)
  • आलं – ½ इंच तुकडा
  • लिंबाचा रस – १ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • काळं मीठ – ¼ चमचा
  • चाट मसाला – ½ चमचा
  • कोथिंबीर – २ चमचे
  • तेल किंवा तूप – १ ते २ चमचे
लोणचं पाहून सुटेल तोंडाला पाणी! १५ मिनिटांमध्ये ताज्या आवळ्यांपासून बनवा आंबट तिखट लोणचं, नोट करा रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम कढई गरम करून त्यात कोणतेही तेल न घालता मखाने ४–५ मिनिटे मंद आचेवर भाजा.
  • मखाने कुरकुरीत झाले की बाजूला काढून ठेवा.
  • मिक्सरमध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, मीठ, काळं मीठ आणि लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करा.
  • पेस्ट खूप घट्ट असल्यास १–२ चमचे पाणी घालू शकता.
  • आता एका कढईत १–२ चमचे तेल किंवा तूप गरम करा.
  • आता त्यात तयार केलेली पुदिन्याची पेस्ट घाला आणि १–२ मिनिटे परता.
  • यानंतर भाजलेले मखाने घालून सर्व मिश्रण नीट मिसळा.
  • झाकण न लावता मंद आचेवर ३–४ मिनिटे परतवा, जेणेकरून पेस्ट चांगली कोरडी होऊन मखाने खमंग होतात.
  • आता यावर वरून चाट मसाला टाका ज्याने याला चटपटीत चव मिळेल.
  • गॅस बंद करा आणि संपूर्ण मिश्रण थंड होऊ द्या.
  • हा स्नॅक चहा–कॉफीसोबत उत्तम लागतो, लंचबॉक्स किंवा प्रवासासाठीही सहजपणे पॅक करता येतो.
  • हवाबंद डब्यात मखाना ८–१० दिवस टिकतात.
  • कमी तेलात बनत असल्याने हा एक हलका आणि आरोग्यदायी पर्याय ठरतो.

Web Title: Healthy and tasty pudina makhana is perfect for evening snacks recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

विकेंड स्पेशल! संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत रेस्टॉरंट स्टाईल ‘चिकन पोपकोर्न’, चव अशी की लहानच काय मोठेही होतील खुश
1

विकेंड स्पेशल! संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत रेस्टॉरंट स्टाईल ‘चिकन पोपकोर्न’, चव अशी की लहानच काय मोठेही होतील खुश

रविवार होईल आणखीनच खास! दुपारच्या जेवणासाठी मालवणी पद्धतीमध्ये बनवा चिकन रस्सा, सर्दी खोकला होईल गायब
2

रविवार होईल आणखीनच खास! दुपारच्या जेवणासाठी मालवणी पद्धतीमध्ये बनवा चिकन रस्सा, सर्दी खोकला होईल गायब

मैद्याचे कशाला? आता घरीच बनवा बेकरी स्टाईल खुसखुशीत ‘गव्हाच्या पिठाचे बिस्कीट’, निवडक साहित्यापासून तयार होईल रेसिपी
3

मैद्याचे कशाला? आता घरीच बनवा बेकरी स्टाईल खुसखुशीत ‘गव्हाच्या पिठाचे बिस्कीट’, निवडक साहित्यापासून तयार होईल रेसिपी

बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी  गोवन पद्धतीमध्ये बनवा हिरव्यागार ओव्याच्या पानांची कढी, नोट करून घ्या पदार्थ
4

बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी गोवन पद्धतीमध्ये बनवा हिरव्यागार ओव्याच्या पानांची कढी, नोट करून घ्या पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.