(फोटो सौजन्य – Youtube)
भारतीय पाककलेत ‘ग्रेव्ही’ हा शब्द ऐकताच आपल्यासमोर जेवणातले ते सुगंधी, समृद्ध आणि रेस्टॉरंटमधील डिशेसमधील खास चव घेऊन येणारे सॉस-सदृश मिश्रण डोळ्यांसमोर उभे राहते. घरगुती जेवणाचे रूप एकदम बदलून टाकण्याची ताकद या ग्रेव्हीमध्ये असते. पण घरच्या घरी अगदी रेस्टॉरंटसारखी ग्रेव्ही तयार करणे हे अनेकांच्या दृष्टीने वेळखाऊ आणि कष्टाचे काम वाटते. म्हणूनच ‘रेडीमेड ग्रेव्ही’ हा पर्याय आजकाल खूप लोकप्रिय झाला आहे.
रेस्टॉरंटमध्ये कोणतीही डिश पटकन सर्व्ह करण्यासाठी अशा बेस ग्रेव्हीज मोठ्या प्रमाणावर तयार करून वापरतात. एकच बेस ग्रेव्ही तयार असली की त्यावरून असंख्य डिशेस काही मिनिटांत तयार करता येतात. जसे की पनीर बटर मसाला, व्हेज कोल्हापुरी, आलू मटर, पनीर हांडी, काजू करी, दुम आलू आणि आणखी कितीतरी…
आपणही घरच्या घरी हाच ‘रेस्टॉरंट ट्रिक’ वापरू शकतो. एकदा ही बेस ग्रेव्ही तयार करून घेतली की आठवडाभर सहज फ्रिजमध्ये टिकते आणि पाहुणे आले, बनवायची वेळ कमी असली किंवा अचानक काहीतरी खास खायची इच्छा झाली तर ही ग्रेव्ही अगदी देवदूतासारखी मदत करते! खास गोष्ट म्हणजे ही ग्रेव्ही कोणत्याही भाजीसोबत वापरली तर तिची चव त्यानुसार बदलते. टोमॅटो, कांदा आणि मसाल्यांचे संतुलित प्रमाण, तसेच हॉटेलसारखी कन्सिस्टन्सी आणि चमचमीत लाल रंग हे सगळं मिळवण्यासाठी ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
साहित्य:
कसे साठवावे?






