Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : साधा चिला नाही यावेळी नाश्त्याला खा ‘पनीर स्टफ्ड चिला’, चवीसह आरोग्याचीही काळजी

Panner Stufed Chila Recipe : मऊदार चिल्याच्या आत मसालेदार पनीरची स्टफिंग आणि इथे तुमचा हेल्दी नाश्ता बनेल आणखीनच चवदार. मुख्य म्हणजे सकाळच्या धावपळीत नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी ही एक परफेक्ट रेसिपी ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 06, 2026 | 03:30 PM
Recipe : साधा चिला नाही यावेळी नाश्त्याला खा 'पनीर स्टफ्ड चिला', चवीसह आरोग्याचीही काळजी

Recipe : साधा चिला नाही यावेळी नाश्त्याला खा 'पनीर स्टफ्ड चिला', चवीसह आरोग्याचीही काळजी

Follow Us
Close
Follow Us:
  • बेसनाचा चिला तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ला असेल पण तुम्ही कधी पनीरच्या स्टफिंगने भरलेला चिला खाल्ला आहे का?
  • हा पनीर स्टफ्ड चिला चवीलाच चांगला लागत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो.
  • हेल्दी पण चविष्ट नाश्त्याच्या शोधात असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
भारतीय स्वयंपाकघरात बेसन चीला हा एक झटपट, पौष्टिक आणि सर्वांच्या आवडीचा नाश्ता मानला जातो. बेसन म्हणजेच हरभऱ्याचे पीठ  प्रथिनांनी समृद्ध, पचनास हलके आणि ग्लूटन-फ्री असल्यामुळे हेल्थ कॉन्शस लोकांसाठी हा उत्तम पर्याय ठरतो. यामध्ये जेव्हा मऊसर पनीरचे स्टफिंग घातले जाते, तेव्हा या साध्या चिल्याला एक खास चव आणि भरपूर पोषणमूल्य मिळते.

Makar Sankrant 2026 : तिळाचे लाडूच नाही तर सणाला हा पारंपारिक पदार्थही मानला जातो खास, जाणून घ्या रेसिपी

पनीर स्टफ्ड बेसन चीला ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या जेवणासाठी अतिशय परफेक्ट आहे. पनीरमधील कॅल्शियम आणि प्रथिने शरीराला ऊर्जा देतात, तर बेसन पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते. भाज्या आणि मसाल्यांच्या हलक्या चवीमुळे हा पदार्थ तेलकट नसूनही चवदार लागतो. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवायला फार वेळ लागत नाही आणि कमी साहित्यांत तयार होते. जर तुम्ही रोजच्या नाश्त्यात काहीतरी नवीन, हेल्दी आणि पोटभर देणारे पदार्थ शोधत असाल, तर पनीर स्टफ्ड बेसन चीला नक्कीच ट्राय करावा. चला तर मग पाहूया ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी घरी कशी बनवायची.

साहित्य

चीलासाठी:

  • बेसन – 1 कप
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • हळद – ¼ टीस्पून
  • लाल तिखट – चवीनुसार
  • जिरे पूड – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • कोथिंबीर – बारीक चिरलेली
  • तेल – तव्याला लावण्यासाठी
स्टफिंगसाठी:
  • किसलेले पनीर – 1 कप
  • कांदा – 1 (बारीक चिरलेला)
  • हिरवी मिरची – 1 (बारीक चिरलेली)
  • चाट मसाला – ½ टीस्पून
  • काळी मिरी पूड – ¼ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
Food Recipe: वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा खमंग कुरकुरीत वडे, लहान मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात बेसन घ्या, त्यात हळद, लाल तिखट, जिरे पूड, मीठ आणि कोथिंबीर घालून पाणी टाकत गुळगुळीत पीठ तयार करा.
  • दुसऱ्या भांड्यात किसलेले पनीर, कांदा, हिरवी मिरची, चाट मसाला, काळी मिरी पूड आणि मीठ एकत्र करून स्टफिंग तयार ठेवा.
  • तवा गरम करून थोडे तेल लावा. तव्यावर बेसनाचे पीठ ओतून गोल पसरवा.
  • चिला अर्धवट शिजला की मधोमध पनीर स्टफिंग ठेवा.
  • चिल्याचे कडे आतल्या बाजूला घडी घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा.
  • दोन्ही बाजूंनी हलके सोनेरी होईपर्यंत भाजा.
  • गरमागरम पनीर स्टफ्ड बेसन चीला हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
  • अधिक हेल्दी बनवण्यासाठी स्टफिंगमध्ये किसलेली गाजर, बीट किंवा पालक घालू शकता

Web Title: Healthy breakfast know how to make paneer stuffed chila at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Healthy Breakfast
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

बाहेरून कशाला? मुंबईचा फेमस स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत ‘वडा पाव’ बनवा आता घरीच, रेसिपी आहे फार सोपी
1

बाहेरून कशाला? मुंबईचा फेमस स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत ‘वडा पाव’ बनवा आता घरीच, रेसिपी आहे फार सोपी

विकतचा कशाला? अस्सल गावराण चवीचा झणझणीत ‘कांदा-लसूण मसाला’ आता बनवा घरीच, नोट करा रेसिपी
2

विकतचा कशाला? अस्सल गावराण चवीचा झणझणीत ‘कांदा-लसूण मसाला’ आता बनवा घरीच, नोट करा रेसिपी

Recipe : सॅलडपासून फ्रुट चाटपर्यंत… साध्यातला साधा पदार्थही होईल चटकदार, घरी बनवा ‘पहाडी हिरवं मीठ’
3

Recipe : सॅलडपासून फ्रुट चाटपर्यंत… साध्यातला साधा पदार्थही होईल चटकदार, घरी बनवा ‘पहाडी हिरवं मीठ’

Recipe : पिझ्झाची मजा लुटा कोणत्याही गिल्टशिवाय… घरी बनवा ‘ग्लूटन फ्री पिझ्झा’, सर्वांच्या आवडीची रेसिपी
4

Recipe : पिझ्झाची मजा लुटा कोणत्याही गिल्टशिवाय… घरी बनवा ‘ग्लूटन फ्री पिझ्झा’, सर्वांच्या आवडीची रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.