कडक उन्हाळ्यात बाहेर गेल्यानंतर उद्भवू शकते उष्णमाघाताची समस्या!
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडक उन्हाळा वाढला आहे. या वाढत्या उन्हाळ्यात शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर पाण्याचे सेवन करावे. याशिवाय नियमित थंड पदार्थ खावेत. कामानिमित्त किंवा इतर वेळी बाहेर गेल्यानंतर सोबत पाण्याची बाटली आणि स्कर्फ घेऊन बाहेर जावे. यामुळे शरीराचे रक्षण होईल.उन्हाळा वाढल्यानंतर प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे उष्माघात. उष्माघाताची समस्या उद्भवल्यानंतर शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर बॉडी डिहायड्रेट होते. त्यामुळे भरपूर पाण्याचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाचा पारा वाढल्यानंतर अनेकांमध्ये उष्माघाताची समस्या दिसून आली आहे. उष्माघातामुळे काहीवेळा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. आज आम्ही तुम्हाला उष्माघाताची समस्या उद्भवल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? उष्माघाताची समस्या उद्भवल्यानंतर कोणते घरगुती उपाय करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
उन्हाळ्यासह इतर सर्वच दिवसांमध्ये भरपूर पाण्याचे सेवन करावे. शरीराला पाण्याची कायम आवश्यकता असते. उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी कमी होऊन जाते. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर अशक्तपणा, चक्कर येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे. यासोबतच आहारात ताक, दही, नारळ पाणी इत्यादी थंड पेयांचा समावेश करावा.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रामुख्याने दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंतच्या वेळेमध्ये बाहेर फिरण्यास जाऊ नये. कारण युवा कालावधीमध्ये कडक ऊन असते. कडक उन्हात बाहेर गेल्यानंतर शरीरात पाणी कमी होऊन जाते, ज्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात सकाळच्या थंड वातावरणात बाहेर जावे.
घर थंड ठेवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरात एसी किंवा पंख्यांचा वापर करावा. पंख्याच्या हवेमुळे सुद्धा घरातील वातावरण थंड राहते. घरातील खोली थंड ठेवण्यासाठी पंखा, कुलरचा वापर करावा.