Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांमध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे हे आहे 4 मोठे संकेत

Neurological Disorders: न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आजार म्हणजे नक्की काय आहे लहान मुलांमध्ये याचे संकेत कशा पद्धतीने ओळखायचे याबाबत तज्ज्ञांनी अधिक माहिती दिली आहे, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 23, 2024 | 11:59 AM
न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमुळे नक्की काय होते

न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमुळे नक्की काय होते

Follow Us
Close
Follow Us:

न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर हे मेंदू, पाठीचा कणा आणि मज्जासंस्थेवर परिणाम करतात, ज्यामुळे मुलांच्या वाढीवर आणि एकूण आरोग्यावर त्याचा लक्षणीय परिणाम होऊ शकतो. पालकांनी काय सावधगिरी बाळगावी आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी या लेखाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले आहे. 

डॉ. शिजी चालिपत, पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रेन, पुणे यांनी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ही स्थिती नक्की काय असते आणि मुलांमध्ये त्याचा कसा परिणाम होतो याबाबत जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock) 

न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे काय?

न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर ही एक अशी स्थिती आहे जी एखाद्याच्या मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम करते. यात मेंदू, पाठीचा कणा आणि नसा यांचा समावेश असू शकतो. कालांतराने, आपल्या मुलाच्या विचार करण्याच्या, वागण्याच्या किंवा विशिष्ट हालचालींवर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. काही मुले या न्यूरोलॉजिकल विकारांसह जन्माला येतात जे अनुवांशिक घटकांमुळे किंवा जन्मादरम्यान गंभीर गुंतागुंतीमुळे उद्भवू शकतात. 

तर काहींना संसर्ग किंवा दुखापतींसारख्या कारणांमुळे ही समस्या उद्भवू शकते. ही स्थिती बिघडण्यापूर्वीच सुरुवातीच्या टप्प्यावर त्याचा शोधणे महत्त्वाचे ठरते कारण ते तुमच्या मुलांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम करते. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर हे मुलांच्या बोलण्यावर, हालचालींवर, विकासावर, शिक्षणावर आणि त्यांच्या भावनिक क्षमतेवरही परिणाम करू शकतात. जर तुमच्या मुलामध्ये अशी असामान्य चिन्हे आढळून आली तर तुम्ही ताबडतोब न्यूरोलॉजिस्टला भेटायला घेऊन जा. ही लक्षणे वेळीच ओळखणे आणि उपचार करणे गरजेचे आहे.

सकाळीच उपाशीपोटी बदाम आणि बेदाणे खाण्याने मिळतात Magical फायदे, जाणून घ्या तथ्य

न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अशी आहेत लक्षणे

न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची लक्षणे नेमकी काय आहेत

आकडी/दौरे: लहान मुलांमध्ये किंवा नवजात शिशुंमध्ये क्वचितच आकडी येते तरीही पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. धक्का बसणे, लाळ येणे, पडणे, शरीर जड होणे, भान हरपणे, आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव न होणे, शारीरक लय नसणे यासारखी लक्षणे शोधावीत. हे अचानक आलेले झटके त्यांच्या मेंदूतील असामान्य विद्युत क्रियांचे संकेत देतात.

एकटक पाहणे किंवा प्रतिसाद न देणे: जेव्हा तुमचे मूल तुमच्याकडे एकटक पाहते किंवा तुम्ही त्यांना बोलवता  तेव्हा ते प्रतिसाद देत नाही. हे देखील एक महत्त्वाचे लक्षण ठरु शकते. ही उदाहरणे अनेकदा पालकांच्या लक्षात येत नसतील परंतु अशा वेळी वेळ न दवडता तुमच्या डॉक्टरांशी भेट घेऊन ताबडतोब ती दूर करणे आवश्यक आहे.

बोलताना अडखणे/ बोबडी वळणे: काही शब्द उच्चारण्यात अडचण येणे, समोरची व्यक्ती काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे हे समजणे किंवा वाक्ये तयार करण्यात अडचणी येणे असणे यामुळे तुमच्या लहान मुलामध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची समस्या उद्भवू शकते. जर तुमचे मूल मोठे झाल्यावरही नीट संवाद साधू शकत नसेल तर न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.

समतोल आणि समन्वय साधण्यात अडचण येणे: जर तुमच्या मुलाला संतुलन किंवा समन्वय राखण्यात अडचण येत असेल तर ते न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे लक्षण असू शकते. समतोल आणि समन्वय साधण्यात अडचणी येऊ शकतात किंवा दैनंदिन क्रिया करण्याचा प्रयत्न करताना अडथळा येऊ होतो. जसे की वस्तू उचलणे, खेळणे किंवा धावणे यासारख्या काही हालचाली करण्याच्या मुलाच्या क्षमतेवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

छातीतल्या जळजळीला अ‍ॅसिडिटी समजण्याची चूक कदापि करू नका, असू शकतो ‘हा’ कॅन्सर

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Here are 4 major signs of neurological disorders in young children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 11:59 AM

Topics:  

  • Health News

संबंधित बातम्या

Madhya Pradesh: पाणी की विष? पाण्यामुळे ‘या’ शहरात ८ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक आजारी
1

Madhya Pradesh: पाणी की विष? पाण्यामुळे ‘या’ शहरात ८ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक आजारी

रुग्ण मुंबईत सर्जन शांघायमध्ये, अंबानी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी
2

रुग्ण मुंबईत सर्जन शांघायमध्ये, अंबानी हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.