फोटो सौजन्य: iStock
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा आपल्याला आरोग्याकडे फारसे लक्ष द्यायला जमत नाही. यामुळे मग अनेक नॉर्मल आरोग्यसंबंधित उद्भवत असतात, जसे की डोकेदुखी, पोटदुखी आणि सर्वात महत्वाचे ‘अॅसिडिटी’. अनेकदा अॅसिडिटीचं प्रॉब्लेम आपल्याला काहीतरी खाल्ल्यानंतर येत असतो. छातीमधील जळजळ हे अॅसिडिटीचे एक सामान्य लक्षण. पण काही वेळेस छातीतील जळजळ हे अॅसिडिटीचे नाही तर कॅन्सरचे सुद्धा लक्षण असू शकते. यामुळे तुम्ही वेळीच सावध राहणे फार गरजेचे आहे.
छातीत जळजळ होत असेल, आंबट ढेकर वारंवार येत असेल तर काळजी घ्या, कारण तो पोटाचा कॅन्सर असू शकतो. बहुतेक लोक याकडे अॅसिडिटी म्हणून दुर्लक्ष करतात, जे नंतर धोकादायक ठरू शकते. पोटाच्या कॅन्सरची लक्षणे वेळीच ओळखली गेली नाहीत तर मृत्यूही होऊ शकतो. अमेरिकन कॅन्सर सोसायटी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, घशाचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. चला जाणून घेऊया कर्करोगाची लक्षणे कोणती आहेत.
तुमच्या सकाळची सुरुवात बनतेय जीवघेणी; चहा पत्तीमध्ये भेसळ, अशी करा पारख
जर ॲसिडिटीची समस्या वारंवार होत असेल तर त्यामुळे पोटाला इन्फेक्शन होऊ शकतो, ज्यामुळे डीएनएलाही नुकसान होऊ शकते. पुढे या इन्फेक्शनमुळे पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
हार्टबर्न म्हणजेच छातीत जळजळ होणे ही सामान्य गोष्ट असू शकते. हे बॅक्टेरियाच्या संसर्गाचे किंवा पोटातील अल्सरचे लक्षण असू शकते. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या काही लोकांना अचानक छातीत जळजळ आणि अॅसिड रिफ्लक्स सारख्या समस्या येतात. त्यामुळे ढेकर येणे आणि हिचकी वाढू शकते. या गोष्टींना हलक्यात घेतले जाऊ नये.
1. पोटाच्या वरच्या किंवा खालच्या भागात वेदना
2. भूक न लागणे
3. कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणे
4. अन्न खाल्ल्यानंतर उलट्या होणे
5. पोटात सूज येणे किंवा फुगल्यासारखे वाटणे.
पोटाचा कर्करोग वेळीच ओळखला गेला तर डॉक्टर त्यावर शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीद्वारे उपचार करतात. अशा स्थितीत छातीत जळजळ, श्वास घेण्यात अडचण, कावीळ, लघवीला त्रास आणि दीर्घकाळ उलट्या होत असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे अतिमहत्त्वाचे आहे.