Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चॉकलेटची चव अन् आरोग्याचा फायदा! मुलांसाठी घरी बनवा हाय प्रोटीन चॉकलेट बार, वाचा सोपी रेसिपी

Chocolate Bar recipe: तुम्हालाही तुमच्या मुलांसाठी काहीतरी हेल्दी आणि टेस्टी बनवायचे असेल तर ही हाय प्रोटीन चॉकलेट बारची रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 27, 2026 | 08:40 PM
photo-- yandex

photo-- yandex

Follow Us
Follow Us:

मुलांना चॉकलेट खायला खूप आवडते. मात्र बाजारात मिळणाऱ्या अनेक चॉकलेट बारमध्ये साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जचे प्रमाण जास्त असते. अशावेळी घरच्या घरी पौष्टिक आणि चविष्ट हाय-प्रोटीन चॉकलेट बार तयार हा आरोग्यासाठी एकदम परपेक्ट आहे. ड्रायफ्रूट्स, ओट्स, पीनट बटर आणि डार्क चॉकलेटच्या मदतीने हा स्नॅक सहज घरच्या घरी बनवता येतो. व्यायाम करणारे, ऑफिसला जाणारे किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांसाठीही हा एक हेल्दी पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया हाय प्रोटीन चॉकलेट बारची सोपी रेसिपी.

Health Tips: दररोज तूप खाताय? ‘या’ चुका टाळा, नाहीतर फायद्याऐवजी होऊ शकते नुकसान

साहित्य

  • दीड कप ओट्स
  • अर्धा कप भाजलेले शेंगदाणे किंवा बदाम
  • दोन स्कूप चॉकलेट फ्लेवर प्रोटीन पावडर
  • अर्धा कप नैसर्गिक पीनट बटर
  • दोन ते तीन चमचे मध
  • एक चमचा कोको पावडर
  • अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स (ऐच्छिक)
  • सुमारे शंभर ग्रॅम डार्क चॉकलेट

कृती

सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात ओट्स, भरड केलेले शेंगदाणे किंवा बदाम, प्रोटीन पावडर आणि कोको पावडर एकत्र मिसळून घ्या. आता त्यात पीनट बटर, मध आणि व्हॅनिला इसेन्स घाला. सर्व मिश्रण हाताने किंवा चमच्याने नीट एकजीव करा. मिश्रण खूप कोरडे वाटत असल्यास एक-दोन चमचे दूध घालू शकता. एका ट्रे किंवा डब्याला बटर पेपर लावून त्यावर हे मिश्रण समान जाडीने पसरवा आणि हलक्या हाताने दाबून सेट करा. डार्क चॉकलेट वितळवून ते या मिश्रणावर समान पसरवा. आवडत असल्यास वरून चिरलेले बदाम, पिस्ते किंवा भोपळ्याच्या बिया घालू शकता.ट्रे एक ते दोन तास फ्रिजमध्ये ठेवा. मिश्रण व्यवस्थित सेट झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार बारच्या आकारात कापा.

टिप्स

हे हाय-प्रोटीन चॉकलेट बार एअरटाइट डब्यात भरून फ्रिजमध्ये सात ते दहा दिवस सहज साठवून ठेवता येतात. सकाळच्या नाश्त्यात, संध्याकाळच्या भुकेवेळी किंवा वर्कआउटनंतर हे बार खाल्ल्यास चव आणि पोषण दोन्ही मिळते. घरच्या घरी तयार केल्यामुळे त्यामध्ये साखरेचे प्रमाण आपल्या गरजेनुसार नियंत्रित ठेवता येते, त्यामुळे मुलांसह मोठ्यांसाठीही हा एक स्वादिष्ट आणि तुलनेने आरोग्यदायी स्नॅक ठरू शकतो.

Health Alert: तुमची किडनी खराब झालीये? शरीरातील ‘या’ 5 लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Web Title: High protein chocolate bar recipe homemade healthy snack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • best recipe
  • Chocolate
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…! गणेशोत्सवात चिमुकल्यांसाठी बालविश्वाची सफर, ‘या’ मंडळाने थेट…
1

Ganeshotsav: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…! गणेशोत्सवात चिमुकल्यांसाठी बालविश्वाची सफर, ‘या’ मंडळाने थेट…

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.