तूपामध्ये हेल्दी फॅट्स, फॅट-सोल्युबल जीवनसत्त्वे आणि ऊर्जा देणारे घटक असतात. मात्र त्यामध्ये कॅलरीचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे रोजच्या आहारात एक ते दोन चमचे तूप पुरेसे मानले जाते. जास्त प्रमाणात तूप खाल्ल्यास वजन वाढण्याचा आणि शरीरातील अतिरिक्त कॅलरी साचण्याचा धोका वाढू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, गरम वरण-भात, पोळी, बाजरी किंवा ज्वारीची भाकरी, खिचडी किंवा डाळींसोबत तूप खाल्ल्यास ते अधिक चांगल्या प्रकारे पचते. गरम अन्नावर थोडे तूप घातल्याने चव वाढतेच, शिवाय पचनालाही मदत होऊ शकते.
तूप हे आरोग्यदायी असले तरी ते यामुळे संपूर्ण पोषण देऊ शकत नाही. त्यामुळे तुपासोबत भाज्या, कडधान्ये, फळे, संपूर्ण धान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. यामुळे शरीराला आवश्यक सर्व पोषक घटक मिळण्यास मदत होते.
काहीजण सकाळी रिकाम्या पोटी तूप खाण्याचा सल्ला देतात. मात्र ही सवय प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. पचनाशी संबंधित समस्या, लठ्ठपणा किंवा कोलेस्टेरॉलचा त्रास असलेल्या व्यक्तींनी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच असा प्रयोग करावा.
बाजारात मिळणारे तूप खरेदी करताना त्याची गुणवत्ता तपासणे महत्त्वाचे आहे. शक्य असल्यास शुद्ध देशी गायीचे तूप वापरावे. तूप वारंवार खूप तापवणे किंवा जळेपर्यंत गरम करणे टाळावे. तसेच तूप हा आरोग्यदायी आहाराचा भाग आहे, औषध नाही. त्यामुळे कोणताही आजार बरा करण्यासाठी त्याचा अतिरेक करू नये.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Digital Stress: सतत मोबाईल वापरामुळे वाढतोय डिजिटल स्ट्रेस; तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका?






