Digital Stress: सतत मोबाईल वापरामुळे वाढतोय डिजिटल स्ट्रेस; तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका?
किडनी व्यवस्थित कार्य करत नसल्यास शरीरातील अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर पडत नाही. त्यामुळे पाय, घोटे, हात किंवा डोळ्यांभोवती सूज दिसू शकते. वारंवार सूज येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
लघवीचे प्रमाण अचानक वाढणे किंवा कमी होणे, फेसाळ लघवी होणे, रक्त येणे किंवा रात्री वारंवार लघवी लागणे ही किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. अशा बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
किडनीच्या कार्यात अडथळा आल्यास शरीरात विषारी द्रव्ये साचू लागतात. तसेच लाल रक्तपेशींच्या निर्मितीवर परिणाम होऊन अशक्तपणा आणि सतत थकवा जाणवू शकतो. त्यामुळे पुरेशी झोप घेतल्यानंतरही थकवा कायम राहत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
किडनी शरीरातील खनिजांचे संतुलन राखण्यास मदत करते. तिचे कार्य बिघडल्यास त्वचा कोरडी पडणे, सतत खाज येणे किंवा त्वचा निस्तेज दिसणे अशी लक्षणे दिसू शकतात.
किडनीचे कार्य बिघडल्यामुळे शरीरात द्रव आणि विषारी घटक साचू शकतात. यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळ, भूक कमी लागणे किंवा स्नायूंमध्ये गोळे येणे अशी लक्षणे दिसू शकतात.
घरात माशा-डासांचा त्रास वाढलाय? फरशी पुसताना पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी मिसळा, मिळेल आराम






