Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hip Dislocation: हिप डिसलोकेशन म्हणजे काय? काय आहे प्रकार, कारणे, लक्षणे आणि उपचार?

मांडीचे हाड सॉकेटमधून बाहेर येणे म्हणजे हिप डिसलोकेशन. याचे कारण काय आहेत, प्रकार, कारणे, लक्षणे आणि उपचार काय आहे? या बाबत डॉ आशिष अरबट ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन यांनी काय सांगितलं बघुयात....

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 20, 2025 | 01:00 PM
Hip Dislocation: हिप डिसलोकेशन म्हणजे काय? काय आहे प्रकार, कारणे, लक्षणे आणि उपचार? (फोटो सौजन्य - istock)

Hip Dislocation: हिप डिसलोकेशन म्हणजे काय? काय आहे प्रकार, कारणे, लक्षणे आणि उपचार? (फोटो सौजन्य - istock)

Follow Us
Follow Us:

हिप डिसलोकेशन म्हणजे मांडीचे हाड सॉकेटमधून बाहेर येणे. हिप डिसलोकेशन ही एक वैधकीय आणीबाणी आहे ज्यामुळे प्रचंड वेदना होतात आणि शारीरिक हालचालींवर मर्यादा येते. हिप डिसलोकेशन हे अपघात, आघात, पडल्यामुळे किंवा खेळातील दुखापतीमुळे होते. त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार पर्याय या बाबत डॉ आशिष अरबट, यांनी सांगितले आहे. डॉ आशिष अरबट ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, जहांगीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, पुणे येथे आहे. ते काय सांगतात बघुयात…

 शरीरात साचलेले पाणी आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक! ‘हे’ घरगुती उपाय केल्यास शरीरातील पाणी होईल कमी

प्रकार काय ?

हिप डिसलोकेशनचे दोन मुख्य प्रकार आहेत.

  • पोस्टरियर
    पोस्टरियर हिप डिसलोकेशन हा सामान्य प्रकार आहे ज्यामध्ये फेमोरल हेड त्याच्या सॉकेटमधून मागे ढकलले जाते. हे बहुतेकदा तेव्हा होते जेव्हा एखादी जोरदार शक्ती किंवा आघात तुमच्या मांडीला मागे ढकलतो, मुख्यतः कार अपघातादरम्यान.
  • अँटीरियर
    अँटीरियर हिप डिसलोकेशन कमी सामान्य आहे आणि जेव्हा फेमोरल हेड सॉकेटमधून पुढे सरकते तेव्हा ते दिसून येते. अचानक पडणे किंवा गंभीर वळणावळणाच्या दुखापती हे अँटीरियर हिप डिसलोकेशनचे प्रमुख कारण असू शकतात.
कारणे काय?

दुखापत, कार अपघात, विशेषतः जेव्हा तुमचा गुडघ्यास मार बसतो, ज्यामुळे मांडीचे हाड त्याच्या सॉकेटमधून बाहेर पडते. उंचावरुन खाली पडल्याने देखील हिप डिसलोकेशन होऊ शकते हे प्रामुख्याने वृद्ध व्यक्तींमध्ये दिसून येते कारण वयानुसार त्यांची हाडं कमकुवत झालेली असतात. ज्या खेळांमध्ये टक्कर होणे सामान्य असते जसे की फुटबॉल अशा खेळांमधील दुखापतीमुळे देखील गंभीर दुखापत होऊ शकते. ज्यांनी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली आहे त्यांच्यासाठी, किरकोळ दुखापत देखील कधीकधी कृत्रिम सांध्यांच्या डिसलोकेशनला कारणीभूत ठरू शकते. म्हणून, एखाद्याने अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे आणि आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे.

लक्षणे कोणती ?

सूज येणे, जखम होणे, स्नायुंमधील बधीरपणा, मुंग्या येणे, मज्जातंतूंचे नुकसान, पायातील संवेदना कमी होणे आणि स्नायू आकुंचन पावणे यांचा समावेश आहे. हिप डिसलोकेशनमुळे तीव्र वेदना होऊ शकतात ज्यामुळे हालचालींवर मर्यादा येतात. प्रभावित पाय हा दुसऱ्या पायापेक्षा लहान दिसू शकतो किंवा मांडीच्या हाडाचा पुढील भाग चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे असामान्य दिसू शकतो. हाडांना, लिगामेंट्सना किंवा रक्तवाहिन्यांना अतिरिक्त नुकसान झाले आहे की नाही यावर लक्षणांची तीव्रता अवलंबून असते.

हिप डिसलोकेशनच्या गुंतागुंतींमध्ये मज्जातंतूंचे नुकसान होऊन रक्त प्रवाह प्रतिबंधीत होतो ज्यामुळे हाडांच्या ऊती मृत पावतात व एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस आणि संधिवातासारख्या समस्या उद्भवतात. हिप डिसलोकेशनवर उपचार करण्यासाठी आणि पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

फ्रॅक्चर किंवा मज्जातंतूंना इजा झाल्यास, जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. उपचारानंतर स्नायुंची ताकद आणि गतिशीलता पुनर्संचयित करण्यासाठी फिजीओ थेरपी नक्कीच फायदेशीर ठरते. जेव्हा फिजिओथेरपी, वेदना शामक औषधे किंवा चालताना आधार घेण्यासारख्या इतर उपचारांमुळे रुग्णाला वेदना कमी होण्यास आणि गतिहीनतेवर मात करण्यास मदत होत नाही तेव्हा हिप रिप्लेसमेंट हा एकमेव पर्याय ठरतो. अशावेळी डॉक्टर शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेतात आणि तुम्हाला स्वतंत्रपणे चालण्यास मदत करतात.

उष्माघाताने उद्भवेल मृत्यू! शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी ऋजुता दिवेकरनी सांगितलेल्या ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश

Web Title: Hip dislocation what it is its types causes symptoms and treatments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 01:00 PM

Topics:  

  • daily health
  • Health Tips
  • strong bones

संबंधित बातम्या

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
1

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
2

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

Epilepsy Treatment In India : देशातील ९४ लाख अपस्मार रुग्णांना मोठा दिलासा! अल्केम लॅबोरेटरीजचे नवे औषध लाँच
3

Epilepsy Treatment In India : देशातील ९४ लाख अपस्मार रुग्णांना मोठा दिलासा! अल्केम लॅबोरेटरीजचे नवे औषध लाँच

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
4

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.