शरीरात साचलेले पाणी आरोग्यासाठी ठरेल अतिशय घातक!
शरीरात पाणी झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. शरीरात साचलेल्या पाण्यामुळे वजन वाढू लागते. अनेकांना सामान्य वाटणारी समस्या दुर्लक्ष केल्यास आणखीनच गंभीर आणि आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. शरीरात पाण्याचे प्रमाण वाढल्यानंतर अंगाला सूज येणे, जडपणा आणि अचानक वजन वाढणे इत्यादी समस्या दिसून येतात. शरीरात पाण्याचे प्रमाण वाढण्यामागे अनेक कारण आहेत. चुकीची जीवनशैली, आहारात जास्त मीठ खाणे, हार्मोनल बदल, कमी हालचाल किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या कारणीभूत असतात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात कोणत्या सवयींमध्ये बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी आणि पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स राहणार क्वारंटाइन! शरीरात वाढू शकतो ‘या’ भयानक आजारांचा धोका
रोजच्या आहारात अनेकांना खारट जेवण जेवण्याची सवय असते. पण आहारात जास्त मीठ खाणे चुकीचे आहे. मिठामध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रोजच्या आहारात कमीत कमी खावे. याशिवाय आहारात तळलेले किंवा प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते. शरीरात सोडियमची पातळी वाढल्यानंतर शरीर पाणी साचणे किंवा अंगाला सूज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. तेलकट पदार्थ खाण्याऐवजी ताजी फळे, भाज्या आणि काजू इत्यादी पौष्टिक पदार्थ खावेत.
शरीर निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते. मात्र शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर विषारी घटक तसेच साचून राहतात आणि ज्यामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवात पाणी होण्याची शक्यता असते. त्यामुळे नियमित 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. भरपूर पाणी प्याल्यामुळे शरीर हायड्रेट राहते, पचनक्रिया सुधारते, त्वचा सुधारते.
सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी हर्बल चहाचे सेवन करावे. या चहाच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. त्यामुळे तुम्ही नियमित ग्रीन टी, पुदिना चहा किंवा आल्याच्या चहाचे सेवन करून शकता. सकाळी उठल्यानंतर अनेक लोक ग्रीन टी चे सेवन करतात. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील चयापचय वाढवतात आणि पाण्याचे प्रमाण कमी करतात. शरीरात साचून राहिलेले पाणी कमी करण्यासाठी नियमित ग्रीन टी प्यावी.
किडनी आतून सडल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ भयानक लक्षणे, वेळीच सावध होऊन घ्या डॉक्टरांचा सल्ला
सकाळी उठल्यानंतर धावपळीमधून 30 मिनिटं व्यायाम आणि योगासने करण्यासाठी काढावीत. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्रिकोणासन, पवनमुक्तासन आणि भुजंगासन केल्यामुळे शरीराचे वाढलेले वजन कमी होते. या आसनांचा नियमित सराव केल्यास शरीरात साचलेले पाणी कमी होऊन अंगाला आलेली सूज कमी होऊन जाईल. 20-30 मिनिटे चालणे, सायकल चालवणे इत्यादी व्यायाम प्रकार आवश्य करावेत.