उष्माघाताने उद्भवेल मृत्यू! शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी ऋजुता दिवेकरनी सांगितलेल्या 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश
वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते, ज्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. शरीरात निर्माण झाली पाण्याची कमतरता आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा आणि उष्णतेचे आजार होऊ शकतात. सतत घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन जाते. त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. उन्हाळ्यात आरोग्यासंबंधित चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे शरीराचे कार्य बिघडून जाते. याशिवाय कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, आहारात निर्माण झालेली पोषक तत्वांची कमतरता इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये योग्य सवयी फॉलो करून आरोग्याची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – iStock)
चहासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन! आतड्यांच्या होतील चिंधड्या, वाढेल पित्ताची समस्या
उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असते. पाण्याची कमतरता शरीरात निर्माण झाल्यानंतर डिहायड्रेशन वाढते. अशावेळी भरपूर पाणी प्यावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील डिहायड्रेशनची समस्या दूर होते. आज म्हणून आम्ही उन्हाळ्यात शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल ऋजुता दिवेकरनी काही घरगुती पदार्थ सांगितले आहेत. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात थंडावा राहील आणि पाण्याची कमतरता कधीच भासणार नाही.
नेहमीच शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असते. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. शरीरात साचून राहिलेले पदार्थ शरीरात उष्णता वाढवतात, ज्यामुळे आरोग्य बिघडते. उन्हाळ्यात पाण्यासोबतच ऊसाचा रस, लिंबू पाणी, बेलाचे सरबत इत्यादी पेयांचे सेवन करावे. उष्णता वाढल्यानंतर त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊन जाते.
शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी बेलाचा रस प्रभावी आहे., बेलाच्या रसाचे सेवन केल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. नैसर्गिकरित्या शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी बेलाच्या रसाचे सेवन करावे. यामध्ये टॅनिन, फ्लेव्होनॉइड्स सारखे दाहक-विरोधी घटक आढळून येतात. शरीराला आली सूज कमी करण्यासाठी बेलाचा रस प्यावा. याशिवाय बेलाचा रस प्याल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि सूज आणि जळजळ कमी होते.
दैनंदिन आहारात नेहमीच बाहेरील पदार्थ खाण्यापेक्षा घरगुती पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचे सेवन करावे. आहारात साधे सोपे आणि पचनास हलके असलेले पदार्थ खाल्यामुळे पचनसंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. आहारात कलिंगड, पेरू, काकडी, संत्र किंवा पपईचे सेवन करावे. तसेच बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी ताक आणि दह्याचे सेवन करावे.
कोरोनानंतर पुन्हा एकदा HKU1 चे थैमान, भारतामध्ये आढळून आलेल्या नव्या विषाणूमुळे वाढली चिंता
रात्री जेवल्यानंतर गुळाच्या पाण्याचे सेवन करावे. यासाठी एक ग्लास पाणी घेऊन त्यात गुळाचा खडा टाकून मिक्स करा. त्यानंतर तयार केलेले पाणी उकळवण्यासाठी ठेवा. पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तयार करून घेतलेले पाणी थंड करून नंतर पाण्याचे सेवन करावे. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.