HMPV शरीराच्या कोणत्या भागावर पहिले संक्रमण करतात (फोटो सौजन्य - iStock)
कोविड-19 नंतर, चीनमधील शेकडो लोकांना त्रास देणारा ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हळूहळू जगातील इतर देशांमध्ये पसरत आहे. भारतात आतापर्यंत या विषाणूचे 5 रुग्ण आढळले आहेत. बेंगळुरू, अहमदाबाद आणि तामिळनाडूच्या विविध भागांतून या प्रकरणांची पुष्टी करण्यात आली आहे.
तज्ज्ञांच्या मते, हा विषाणू प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर परिणाम करतो आणि त्याची लक्षणे सामान्य फ्लूसारखी असू शकतात. तथापि, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये आणि लहान मुलांमध्ये यामुळे गंभीर संसर्ग होऊ शकतो, ज्याची सुरूवात आता महाराष्ट्रातही प्रकर्षाने झालेली दिसून येत आहे. सध्या आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या असून कोरोनासारखी गंभीर परिस्थिती उद्भवू नये याची काळजी घेतली जात आहे. मात्र त्याआधी हा विषाणू सर्वात पहिले शरीराच्या कोणत्या भागावर आक्रमण करतो जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
HMPV कोणत्या भागावर पहिले होतो?
HMPV हा विषाणू प्रथम फुफ्फुस आणि वायुमार्गांना लक्ष्य करतो. या संसर्गामुळे श्वसन प्रणालीच्या पेशींना नुकसान होते, ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते, खोकला आणि इतर समस्या निर्माण होतात. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये, लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये हा संसर्ग झपाट्याने पसरतो आणि त्यामुळे श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात.
HMPV Virus: राज्यात HMPV चा धोका, पुन्हा होम क्वारंटाईन? काय म्हणाले आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर?
शरीरात कोणते बदल होतात?
कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो
संरक्षण कसे करावे?
तज्ज्ञांच्या मते, एचएमपीव्हीपासून बचाव करण्यासाठी स्वच्छतेची काळजी घेणे, गर्दीची ठिकाणे टाळणे आणि प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे महत्त्वाचे आहे. लहान मुले आणि वृद्धांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
HMPV इन्फेक्शनपासून कोरोनाचे Vaccine वाचवू शकते का? वायरोलॉजिस्टने केला खुलासा
सरकार आणि डॉक्टरांचा सल्ला
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की संक्रमित मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी इतर कोणत्याही देशात अलीकडे प्रवास केल्याची नोंद नाही. डॉक्टरांनी लोकांना आवाहन केले आहे की, श्वास घेण्यास त्रास किंवा इतर लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसंच आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनानुसारच रूग्णांनी योग्य उपाय करावेत आणि घराबाहेर पडू नये, जेणेकरून दुसऱ्यांना संसर्गाचा त्रास होईल.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.