Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care Tips: कोंड्यापासून त्रस्त आहात? घरच्या घरी तयार करा अँटी-डँड्रफ शॅम्पू; केस होतील निरोगी

DIY Shampoo For Dandruff: प्रदूषण, धूळ आणि चुकीच्या हेअर केअरमुळे कोंड्याची समस्या वाढत असून त्यामुळे खाज, केस गळणे आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. काही नैसर्गिक घटकांच्या मदतीने घरच्या घरी अँटी-डँड्रफ शॅम्पू तयार करून कोंड्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 14, 2026 | 06:46 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • कोंड्यापासून त्रस्त आहात?
  • घरी तयार करा अँटी-डँड्रफ शॅम्पू
  • केस होतील निरोगी
आजकाल प्रदूषण, धूळ, घाम आणि चुकीच्या हेअर केअरमुळे कोंड्याची समस्या वाढत आहे. कोंड्यामुळे टाळूला खाज येणे, केस गळणे, त्वचेवर पुरळ येणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अनेकजण महागडे अँटी-डँड्रफ शॅम्पू वापरतात, मात्र काही घरगुती घटकांच्या मदतीने नियमित शॅम्पूलाच अधिक प्रभावी बनवता येते. तज्ज्ञांच्या मते, काही नैसर्गिक घटकांमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे कोंडा कमी करण्यास मदत करू शकतात. जाणून घ्या घरच्या घरी अँटी-डँड्रफ शॅम्पू बनवण्याची सोपी पद्धत.

Blood Donation: रक्तदान करण्यासाठी तुम्ही फिट आहात का? जाणून घ्या आरोग्याचे महत्त्वाचे नियम

एरंडेल तेल, ग्लिसरीन आणि अॅपल सायडर व्हिनेगर

नियमित शॅम्पूमध्ये एक चमचा एरंडेल तेल, एक चमचा ग्लिसरीन आणि एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळांवर लावा आणि सुमारे १० मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. हा उपाय टाळूचा कोरडेपणा कमी करून कोंडा नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतो.

टी ट्री ऑइलचा वापर

टी ट्री ऑइलमध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. नियमित शॅम्पूमध्ये ५ ते १० थेंब टी ट्री ऑइल मिसळून वापरल्यास कोंड्याची तीव्रता कमी होण्यास मदत होते. तसेच टाळूचे आरोग्य सुधारण्यासही याचा फायदा होतो.

कोरफड (अलोवेरा) जेलचा समावेश

शॅम्पूमध्ये थोडे ताजे कोरफडीचे जेल मिसळून केस धुतल्यास टाळूला थंडावा मिळतो. कोरफडीमधील अँटीफंगल गुणधर्म खाज आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. नियमित वापरामुळे टाळू अधिक निरोगी राहू शकतो.

कडुनिंबाचा नैसर्गिक उपाय

कडुनिंबाची पेस्ट किंवा कडुनिंब अर्क शॅम्पूमध्ये मिसळून वापरणे हा देखील प्रभावी उपाय मानला जातो. कडुनिंबातील जंतुनाशक गुणधर्म टाळूवरील बुरशी आणि जंतूंवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

महत्त्वाचा सल्ला

कोणतीही अॅलर्जी असल्यास आधी पॅच टेस्ट करा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोंड्याची समस्या खूप वाढल्यास किंवा दीर्घकाळ कायम राहत असल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य आहार, पुरेसे पाणी, नियमित केसांची स्वच्छता आणि नैसर्गिक उपाय यांचा अवलंब केल्यास कोंड्यापासून सुटका मिळवणे अधिक सोपे होऊ शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Sleeping Tips: रात्री झोप येत नाही? फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, मिळेल गाढ अन् शांत झोप

Web Title: Home made anti dandruff shampoo natural remedies dandruff treatment tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • dandruff issue
  • hair care tips
  • hair care tips in marathi

संबंधित बातम्या

Hair Care Tips: केस गळण्याआधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, टक्कल पडू नये म्हणून जीवनशैलीत फॉलो करा निरोगी सवयी
1

Hair Care Tips: केस गळण्याआधी दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, टक्कल पडू नये म्हणून जीवनशैलीत फॉलो करा निरोगी सवयी

Hair Care Tips:  हेअर स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंगमध्ये काय फरक? सुंदर आणि सिल्की केसांसाठी कोणती ट्रीटमेंट बेस्ट?
2

Hair Care Tips: हेअर स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंगमध्ये काय फरक? सुंदर आणि सिल्की केसांसाठी कोणती ट्रीटमेंट बेस्ट?

Grey Hair: तरुण वयात केस पांढरे होत आहेत? ‘या’ सवयी बदला, नाहीतर वाढू शकते समस्या
3

Grey Hair: तरुण वयात केस पांढरे होत आहेत? ‘या’ सवयी बदला, नाहीतर वाढू शकते समस्या

Hair Botox:  हेअर बोटॉक्सची वाढती क्रेझ! केस होतात सिल्की अन् शायनी, ट्रीटमेंटआधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
4

Hair Botox: हेअर बोटॉक्सची वाढती क्रेझ! केस होतात सिल्की अन् शायनी, ट्रीटमेंटआधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.