मूळव्याधासाठी प्रभावी ठरतील स्वयंपाक घरातील 'हे' शक्तिशाली पदार्थ
दैनंदिन आहारात तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. जंक फूडचे अतिसेवन, आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी गोष्टीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे दररोज शरीराला पचन होईल अशा हलक्या पदार्थांचे सेवन करावे. बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागल्यानंतर पोट स्वच्छ न होणे, सतत ढेकर येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता हे बद्धकोष्ठतेचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यास बद्धकोष्ठतेवर तात्काळ आराम मिळेल. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
दुपारच्या जेवणात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, पोटासंबंधित समस्यांमध्ये होईल वाढ
बद्धकोष्ठतेपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी दुधामध्ये तूप मिक्स करून प्यावे. तुपामध्ये असलेले गुणधर्म शरीरात थंडावा टिकवून ठेवण्याचे काम करते. यामुळे शरीर सुधारते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात दुधात तूप मिक्स करून प्यावे. यामुळे पचनक्रिया सुधारेल. तुपाचे सेवन केल्यामुळे आतड्यांमधील हालचाली सुधारतात. आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित दुधात तूप मिक्स करून प्यावे.
दुधाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यासाठी एक ग्लास कोमट दुधात तूप टाकून मिक्स करावे. त्यानंतर दुधाचे सेवन केल्यास शरीरातील सर्व समस्या दूर होतील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. पोटासंबंधित सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दैनंदिन आहारात दूध तूप टाकून प्यावे.
मूळव्याधासाठी प्रभावी ठरतील स्वयंपाक घरातील ‘हे’ शक्तिशाली पदार्थ
तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करून बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात दुधात तूप मिक्स करून प्यावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. दुधामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक पोषक घटक आढळून येतात, याशिवाय तुपामध्ये असलेले फॅटी अॅसिड आतड्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. दुधात तूप टाकून नियमित प्यायल्यास पचनक्रिया सुधारेल.
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा पपईचे सेवन, शरीरात होतील सकारात्मक बदल
आतड्यांमध्ये आलेली सूज कमी करण्यासाठी दूध आणि तुपाचे मिश्रण करून एकत्र प्यावे. यामुळे सूज, जळजळ किंवा गॅसची समस्या कमी होते आणि आराम मिळतो. तुपामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे आतड्यांतील जळजळ कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी या मिश्रणाचे नियमित सेवन करावे.