काखेत वाढलेला काळेपणा- दुर्गंधी जाईल पळून! 'या' पद्धतीने करा तुरटीचा वापर
सुंदर दिसण्यासाठी आणि सौंदर्यात भर घालण्यासाठी महिला नेहमीच फॅशनेबल आणि छानछान कपडे घालून तयार होतात. ड्रेस, साडी, वेस्टन ड्रेस इत्यादी अनेक नवनवीन फॅशनचे कपडे घातले जातात. मात्र बऱ्याच महिला काखेत वाढलेल्या काळेपणामुळे त्रस्त आहेत. काखेतील त्वचा काळी झाल्यानंतर सिव्हलेस कपडे घालण्याची लाज वाटू लागते. तर काही महिलांचा आत्मविश्वास सुद्धा कमी होऊन जातो. काखेत वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले मास्क, रॉलोन किंवा इतर अनेक वेगवेगळ्या क्रीम आणून लावल्या जातात. मात्र या क्रीम लावल्यामुळे त्वचा अधिकच निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. त्वचेमधील तेल कमी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काखेत वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी तुरटीचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तुरटी त्वचा उजळदार करण्यास मदत करते.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी तुरटी अतिशय प्रभावी ठरते. यासाठी वाटीमध्ये तुरटी पावडर घेऊन त्यात गुलाबपाणी टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण काखेत लावून काहीवेळ तसेच ठेवा.यामुळे काखेत वाढलेला काळेपणा कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर वाढलेली डेड स्किन कमी होण्यास मदत होईल. १० मिनिट ठेवल्यानंतर काखेतील त्वचा पाण्याने स्वच्छ करा. हा मास्क नियमित कीकाखेत लावल्यास काखेत वाढलेला काळेपणा कमी होऊन काख स्वच्छ होईल.
लिंबाच्या रसात असलेले सायट्रिक ऍसिड काळेपणा कमी करण्यासाठी मदत करते. वाटीमध्ये तुरटीची पावडर घेऊन त्यात लिंबाचा रस मिक्स करा. तयार केलेले मिश्रण काखेत वाढलेल्या काळेपणावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर लिंबाच्या सालीचा वापर करून काख हलक्या हाताने मसाज करा. यामुळे डेड स्किन निघून जाईल आणि काख उजळण्यास मदत होईल. आठवडाभर नियमित लावल्यास काखेत वाढलेला काळेपणा कमी होईल.
बऱ्याचदा घाईगडबडीमध्ये कोणतीही गोष्ट करण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही अंघोळ करताना नुसतीच तुरटी काखेमध्ये फिरवल्यास काख उजळण्यास मदत होईल. काखेत काळेपणा वाढण्याची अनेक कारणे आहेत. चुकीच्या पद्धतीने लेझर वापरल्यास किंवा कोणतेही चुकीचे प्रॉडक्ट लावल्यामुळे काखेत काळेपणा वाढू लागतो.