दातांवरील पिवळा थर काढण्यासाठी काय करावे, सोप्या टिप्स (फोटो सौजन्य - iStock)
कोणाच्याही चेहऱ्यावर हसू आले की त्या व्यक्तीच्या सौंदर्यात अधिक भर पडते असं म्हणतात आणि नक्कीच याला कोणीही अपवाद नाही. हसल्यानंतर सुंदर स्वच्छ दात दिसले की समोरचाही आनंदी होतो. पण हेच जर दातावर पिवळा थर असेल अथवा दातांवर कीड असेल तर नक्कीच तुम्हाला लाजिरवाणे व्हायला होते. अनेकदा दातांवर पिवळा थर असल्याने तर लोकं खळखळून हसत नाहीत. पण तुम्ही यावर घरीच उपाय करू शकता.
दातांवर जमा झालेल्या पिवळ्यापणामुळे आपल्याला बऱ्याचदा लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागतो. दातांवर जमा झालेला पिवळा थर काढून टाकण्यासाठी अनेक वेळा लोक डॉक्टरांकडे जातात आणि दात स्वच्छ करतात. त्याच वेळी, अनेकदा दातांचा पिवळापणा दूर करण्यासाठी टूथपेस्टदेखील बदलली जाते, परंतु त्याचा फारसा फायदा होत नाही. तुम्ही दात चमकदार करण्यासाठी काही घरगुती उपायांची मदतदेखील घेऊ शकता. दात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही घरातील नियमित वापरल्या जाणाऱ्या लिंबाची मदत घेऊ शकता. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड आणि व्हिटॅमिन सी असते, जे दात स्वच्छ करण्यास मदत करू शकते. ते कसे वापरायचे ते आपण दंतचिकित्स डॉ. हरिश तन्ना यांच्याकडून जाणून घेऊया.
लिंबाची साल आणि रस
लिंबाच्या रसासह सालीचा करून घ्या वापर
दात स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. यासाठी लिंबाचा रस काढा आणि नंतर त्याची साल दातांवर घासून घ्या. लिंबाच्या रसात ब्लीचिंग एजंट आढळतात जे दात स्वच्छ करण्यास आणि पिवळा थर काढून टाकण्यास मदत करतात. परंतु दातांवर लिंबाचा वापर जास्त काळ टाळावा. कारण त्याचा जास्त वापरदेखील दातांचे नुकसान करू शकतो.
रोज ब्रश करूनही दातांवर साचतोय पिवळा थर? कारण आणि सोपे घरगुती उपाय
लिंबू आणि बेकिंग सोडा
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी लिंबाचा रस बेकिंग सोड्यामध्ये मिसळता येतो. यासाठी लिंबाच्या रसात बेकिंग सोडा मिसळा आणि तो दातांवर लावा. नंतर लिंबाच्या सालीने काही वेळ घासून स्वच्छ करा. यामुळे दातांवरील पिवळा थर त्वरीत जाण्यास मदत मिळते आणि दात स्वच्छ पांढरे होतात. तसंच दातांच्या या पिवळ्या थरामुळे येणारी दुर्गंधीही नाहीशी होते.
लिंबाचे फायदे
लिंबाचे काय फायदे आहेत जाणून घ्या
लिंबू हे विटामिन सी युक्त असून त्याचे अनेक फायदे आहेत आणि विशेषतः दातांसाठी तुम्ही लिंबाचा उपयोग करून घेऊ शकता. दात पिवळसर होत असतील तर तुम्ही लिंबाचे साल आठवड्यातून दोन वेळा दातावर घासून दात स्वच्छ करून घेऊ शकता.
दात पिवळे पडत चाललेत? घरगुती उपाय करून पहा, मोत्यासारखे चमकतील दात
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.