लिंबाच्या सालींपासून बनवा चटकदार लोणचं
विटामिन सी युक्त लिंबू आरोग्य आणि त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहेत. लिंबाचा वापर अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. चक्कर आल्यानंतर किंवा इतर कोणतीही समस्या उद्भवल्यानंतर सगळ्यात आधी लिंबू पाणी दिले जाते. लिंबामधील रस वापरून झाल्यानंतर लिंबाच्या साली फेकून दिल्या जातात. मात्र या सालींचा वापर करून तुम्ही चवदार लोणचं बनवू शकता. लिंबामध्ये विटामिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर आवश्यक घटक सुद्धा आढळून येतात. ज्यामुळे आरोग्यासोबतच त्वचेलासुद्धा फायदा होतो. लिंबामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेवर डाग, पिंपल्स, मुरूम घालवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे त्वचेसंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यानंतर तुम्ही लिंबाचा वापर करू शकता.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: कोथिंबीर नाही तर कोबीची खमंग वडी बनवून पहा
लिंबामधील रस काढून घेतल्यानंतर अनेकदा लिंबाच्या साली कचऱ्यात फेकून दिल्या जातात किंवा कुकरच्या भांड्यात टाकल्या जातात. पण असे कारण्यावेजी तुम्ही लिंबाच्या सालींचा वापर करून लिंबाचे गोड लोणचे बनवू शकता. हे लोणचं बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तसेच कमीत कमी साहित्यामध्ये लिंबाच्या सालीचे लोणचं बनवलं जात. चला तर जाणून घेऊया लिंबाच्या सालीचे लोणचं बनवण्याची कृती.