गरोदरपणात बद्धकोष्ठतेचा समस्या उद्भवते? मग 'हे' घरगुती उपाय करून मिळवा आराम
प्रत्येक महिलेसाठी आई होणं ही भावना अतिशय सुखद आणि मनाला आनंद देणारी भावना आहे. आई होण्याचे सुख प्रत्येक महिलेले अनुभवायचं असतं. गर्भधारणेच्या दरम्यान महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. या बदलांकडे लक्ष देऊन स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. गरोदरपणात प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागल्यानंतर महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गरोदरपणात महिलांची पचनक्रिया कमकुवत होऊन जाते, ज्यामुळे महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू लागतो. मात्र या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतात.(फोटो सौजन्य – iStock)
हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याआधी शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे, लक्ष न दिल्यास उद्भवेल मृत्यू
आहारात होणारे बदल, अपुरी झोप, पचनास जड असलेले पदार्थ खाणे, अवेळी जेवणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. ज्यामुळे गरोदरपणात महिलांना अनेक समस्या उद्भवतात. या दिवसांमध्ये गोळ्या औषधांचे अतिसेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गरोदरपणात बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
गरोदरपणात पचनक्रिया कमकुवत झाल्यामुळे पोटासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागल्यास मालिश करावी. पोटावर मालिश करताना हलक्या हाताने करावी. जास्त जोर लावून मालिश करू नये. यामुळे पोटात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. पोटावर मालिश करताना पोटावर दाब न येता हलक्या हाताने मालिश करावी. यामुळे गरोदरपणात उद्भवलेली बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.
गरोदरपणात शरीराची हालचाल करणे अतिशय महत्वाचे आहे. शारीरिक हालचाली केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे आठवड्यातून तीनदा 30 मिनिटं व्यायाम करणे, यामुळे आतड्या निरोगी राहतात. याशिवाय चालणे, प्राणायाम करणे, योग करणे, पोहायला जाणे इत्यादी अनेक गोष्टी करणे आवश्यक आहे. यामुळे शरीर सक्रिय राहील आणि आरोग्याला अनेक फायदे होतील.
दारू पिणाऱ्या महिलांचा ‘या’ धोकादायक आजारांमुळे होऊ शकतो मृत्यू, वेळीच सावध व्हा
बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी सैंधव मीठ अतिशय प्रभावी आहे. या मिठाचा वापर केल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. यामध्ये असलेले रेचक गुणधर्म पोटासंबंधित समस्यांपासून आराम मिळवून देतात. यासाठी कोमट पाण्यात सैंधव मीठ टाकून नियमित सेवन करा. हा उपाय केल्यामुळे पोटात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आराम मिळेल. घरगुती उपाय केल्यामुळे तात्काळ आराम मिळतो.