हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याआधी शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणे
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, पाण्याचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन, पोषक तत्वांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. काहींना नेहमी तेलकट आणि तिखट पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र नेहमी नेहमी या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर साचून राहतो. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेल्या चिकट थरामुळे आरोग्याला हानी पोहचते.(फोटो सौजन्य – iStock)
गर्भाशय काढल्यानंतर मासिक पाळी येते का? जाणून घ्या मासिक पाळीचा आरोग्यावर होणारा परिणाम
शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयविकाराचा झटका येणे, हार्ट ब्लॉकेज, कोरोनरी आर्टरी डिजीज इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात बदल करून शरीराला पचन होईल अशा पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉलचा थर साचून राहिल्यामुळे हार्ट ब्लॉकेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही समस्या उद्भवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.
हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर छातीमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. याशिवाय उलटी किंवा मळमळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय शरीराची पचनक्रिया बिघडू लागते. मळमळ किंवा अपचनाची समस्या उद्भवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. हार्ट ब्लॉकेज होण्याआधी शरीरात ही सामान्य लक्षणे दिसू लागतात.
हार्ट ब्लॉकेज किंवा हार्ट अटॅक येण्याआधी पायांमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. पायांमध्ये होणाऱ्या वेदनांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र दुर्लक्ष न करता लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलचा थर पायांमध्ये साचून राहतो, ज्यामुळे पायांमध्ये वेदना होणे आणि नखं, त्वचा पिवळी दिसू लागते. गुडघे दुखू किंवा पायांमध्ये वेदना होऊ लागतात.
शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.शरीरात थकवा निर्माण झाल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात, मात्र दुर्लक्ष न करता उपचार करावे. नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यानंतर हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिकचा वेळ लागतो. याशिवाय रक्तशुद्ध करण्यास अनेक अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे हृद्यविकाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
हार्ट ब्लॉकेज किंवा हृदयविकाराचा झटका येण्याआधी छातीमध्ये तीव्र वेदना होऊ लागतात. या वेदनांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्यास किंवा छातीमध्ये वेदना झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचून राहिल्यानंतर शरीराला पुरेसं ऑक्सीजन मिळत नाही.