(फोटो सौजन्य: istock)
दारूचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी घातक असते हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र तरीही आपल्या शुल्लक आनंदासाठी लोक त्याचे सेवन करू पाहतात. आजकाल पुरुषच काय तर महिलाही मद्यपान करतात. अनेकांना हे ठाऊक नाही पण या दारूचा पुरुषांच्या आणि महिलांच्या शरीरावर काहीसा वेगवेगळा परिणाम होत असतो. स्त्री आणि पुरुषांच्या शारीरिक रचनेमुळे दोघांवर अल्कोहोलचा प्रभाव देखील भिन्न आहे. खरं तर, ज्या महिला जास्त दारू पितात त्यांना अनेक गंभीर आजारांचा धोका जास्त असतो.
पुरुष महिलांपेक्षा जास्त अल्कोहोल पितात, परंतु महिलांवरील अल्कोहोलचा परिणाम पुरुषांपेक्षा अधिक गंभीर आहे. इतकेच नाही तर अति मद्यपान करणाऱ्या महिलांना स्मृतिभ्रंश, कोमा, हृदयविकार, यकृत खराब होणे आणि अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो. दारू पिणाऱ्या महिलांचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, हृदयविकार आणि ब्रेन स्ट्रोक यासह अनेक गंभीर आजारांनी मृत्यू होऊ शकतो.
महिलांनो! या गोष्टी चुकूनही करू नका शेअर, इमेज होईल खराब; नात्यातही येऊ शकतो दुरावा
मद्यपान केल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो. त्यामुळे यकृताचा कर्करोग, मेंदूचा कर्करोग, मानेचा कर्करोग, आवाजाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका लक्षणीय वाढतो. ज्या स्त्रिया दिवसातून एक ड्रिंक पितात त्यांना देखील अनेक गंभीर आजारांचा धोका असतो. त्यामुळे याचे सेवन वेळीच टाळायला हवे. आज आपण या लेखात अल्कहोलच्या सवयीमुळे महिलांना कोणत्या आजरांचा धोका असतो ते जाणून घेणार आहोत.
अन्ननलिकेचा कर्करोग
अल्कोहोल सेवनामुळे अन्ननलिका कर्करोग होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. यामुळे गिळण्यात अडचणी निर्माण होतात. तसेच अन्न गिळताना वेदनाही जाणवू लागतात.
कोलोरेक्टल कर्करोग
कोलोरेक्टल कर्करोग हा जगभरातील सर्वात चिंताजनक रोग आहे. अल्कोहोलचे सेवन कोलोरेक्टल कर्करोगाला वाढण्यास मदत करते. हा मोठ्या आतड्यात किंवा गुदाशयात पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा कर्करोग आहे.
लिव्हर कॅन्सर
अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे लिव्हर कॅन्सरचा धोका वाढतो. अल्कोहोलचे सेवन अल्कोहोलमुळे होणाऱ्या लिव्हर रोगांना जसे की हिपॅटायटीस आणि लिव्हर सिरोसिसच्या वाढीस मदत करते.
कोरियन ग्लास स्किनचे सिक्रेट! ट्राय करा हे DIY Masks, पहिल्या वापरतच चेहऱ्यावर दिसून येतील बदल
हृदयरोग
जास्त मद्यपान केल्याने उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका वाढतो. हा आजार आजकाल सर्वात धोकादायक आजारांपैकी एक आहे. यामुळे व्यक्तीला कधीही झटका येण्याचा धोका असतो ज्यात त्याचा मृत्यूही होऊ शकतो.
ब्रेन स्ट्रोक
मद्यपान केल्याने मेंदूचे नुकसान होण्याचा धोका लक्षणीय वाढतो. त्यामुळे मेंदूचे कार्य नीट होत नाही. यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होणे बंद होते. तसेच मेंदूच्या पेशी मृत पडू लागतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.