गुडघे दुखीवर आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
जीवनशैलीमधील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. पूर्वीच्या काळी वयाच्या साठीनंतर गुडघे दुखीचा त्रास लोकांना होत होता. मात्र बदलती जीवनशैली, अपुरी झोप, अतिप्रमाणात बाहेरच्या पदार्थांचे सेवन, कामाची धावपळ इत्यादी गोष्टींमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून गेले आहे. अनेकांना वयाच्या पंचवीशीमध्येच गुडघे दुखीचा त्रास जाणवू लागला आहे. गुडघे दुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर खाली बसताना आणि उठल्यानंतर अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. गुडघे दुखी ही एक सामान्य समस्या असून तरुणांना सुद्धा गुडघे दुखीचा त्रास होत आहे. गुडघे दुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात, मात्र असे केल्यामुळे आजार आणखीन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गुडघे दुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
प्रत्येक स्वयंपाक घरात हळद ही असतेच. हळदीचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. हळदीमध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्यासाठी गुणकारी आहेत. तसेच यामध्ये अँटीसेप्टिक, अँटीबैक्टीरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-एलर्जिक गुणधर्म आहेत, जे गुडघेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी मदत करतात. गुडघ्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी मागील आणि वर्षांपासून आंबे हळदीचा वापर केला जात आहे. हळदीचा वापर केल्यामुळे त्वचा, यकृत आणि पचनसंस्थेला अनेक फायदे होतात.
हे देखील वाचा: महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘ही’ योगासने, आरोग्य राहील तंदुरुस्त
आल्यामध्ये असलेल्या दाहक विरोधी गुणधर्मांनी आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे गुडघे दुखीच्या वेदनांपासून आराम मिळतो. आल्यामध्ये विटामिन ए, विटामिन डी, विटामिन डी, आयर्न, झिंक आणि कॅल्शियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. शरीरातील अनेक गंभीर आजार दूर करण्याचे काम आलं करते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आल्याचे पाणी प्यायल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
हाडांच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी आणि गुडघ्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी निलगिरीच्या तेलाचा वापर करावा. हे तेल लावण्यानंतर हलक्या जातीने गुडघ्यांना मसाज करा. यामुळे गुडघ्यांना आलेली सूज कमी होते. यामुळे संधिवाताच्या त्रासापासून कमी प्रमाणात आराम मिळतो.
हे देखील वाचा: वजन कमी करण्यासाठी सतत लिंबू पाणी पिताय! मग होऊ शकते आरोग्याचे गंभीर नुकसान
दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडेंट, अँटीडायबेटिक आणि अँटीबैक्टीरियल गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म त्वचा आणि हाडांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहेत. गुडघ्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी तुम्ही दही, चीज किंवा इतर गोष्टींमध्ये दालचिनी पावडर मिक्स करून खाऊ शकता. दालचिनीचे सेवन केल्यामुळे हृदयाच्या आरोग्य सुधारते.