महिलांनी निरोगी आरोग्यासाठी नियमित करावी 'ही' योगासने
धावपळीच्या जीवनात कामातून वेळ काढून महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सतत घरातील काम, ऑफिसमधील काम आणि इतरही कामांमुळे महिला पूर्णपणे थकून जातात. महिलांना शारीरिक आणि मानसिक समस्यांचं नेहमीच सामना करावा लागतो. कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे लक्ष द्याल वेळ मिळाला नाहीतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. जीवनशैलीतील काही छोटे बदल पुढे जाऊन मोठे होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे निरोगी जीवनशैली आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी योगासनांची मदत घ्यावी. महिला आणि पुरुषांच्या आरोग्यासाठी योगासने खूप फायदेशीर आहेत.
घरातील काम, मुलांना सांभाळणे, ऑफिसला जाणे इत्यादी सर्व कामांमधून महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे आणि आवडीनिवडींकडे लक्ष द्याला वेळ भेट नाही. यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, गुडघेदुखी, मासिक पाळीमध्ये वेदना इत्यादी अनेक आरोग्यासंबंधित समस्यांचा महिलांना सामना करावा लागतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी महिलांनी सकाळी उठल्यानंतर नियमित योगासने करावीत. योगासने केल्यामुळे शरीर निरोगी राहून बिघडलेले आरोग्य सुधारण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: वजन कमी करण्यासाठी सतत लिंबू पाणी पिताय! मग होऊ शकते आरोग्याचे गंभीर नुकसान
अनेकदा लठ्ठपणा किंवा इतर काही कारणांमुळे मानसिक अन् शारिरीक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. बिघडलेले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित धनुरासन करावे. मासिक पालीमधील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी धनुरासन फायदेशीर आहे. हे आसन सकाळी उठल्यानंतर नियमित केल्यामुळे स्नायूंचे आरोग्य सुधारून पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
हे देखील वाचा: फक्त शरीरात प्रोटीन असून चालत नाही, ‘ही’ पोषक तत्वे सुद्धा असणे गरजेचे
धनुरासन करताना सगळ्यात आधी योगा मॅटवर झोपा.त्यानंतर दोन्ही गुडघे वाकवा आणि पायाचे घोटे तळहाताने पकडा. त्यानंतर तुमच्या क्षमतेनुसार पाय आणि हात वर करा. हात पाय वर केल्यानंतर १ सेकंड ठेवल्यानंतर पुन्हा एकदा सामान्य स्थितीमध्ये यावे. या आसनाचा नियमित सराव केल्यास शरीरातील ताणतणाव निघून जाईल.
योगासनांमधील सगळ्यात सोपे आसन म्हणजे सूखासन. हे आसन लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच करू शकतात. या आसनाचा नियमित सराव केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. हे योगासन करण्यासाठी सगळ्यात आधी योगा मॅटवर बसा. त्यानंतर दोन्ही डोळे बंद करून पाय तळव्यांजवळ ठेवा. त्यानंतर दीर्घश्वास घ्या.