बियांचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे
सर्वच महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मासिक पाळीच्या चार ते पाच दिवसांमध्ये पोटात दुखणे, क्रम्प्स येणे, मळमळ, उलटी सारखं होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. तर काही महिलांच्या ओटीपोटात अनेक वेदना होतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी काही महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात, मात्र या औषधांचा फारकाळ प्रभाव टिकून राहत नाही. मासिक पाळीमध्ये वेदना होणे ही सामान्य समस्या आहे. जास्त त्रास होण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला मेडिकलमधील गोळ्या आणून खातात, मात्र या गोळ्यांमुळे किडनीवर परिणाम होण्याची शक्यता असते. मासिक पाळी आल्यानंतर क्रॅम्प्स, मूड बदलणं, थकवा, चिडचिड, राग, ताप इत्यादी सामान्य समस्या जाणवतात. काही महिला प्रचंड शारीरिक त्रास होतो तर काहींना मासिक पाळीमध्ये कोणतीही समस्या उद्भवत नाही.(फोटो सौजन्य-istock)
मासिक पाळीमध्ये मानसिक आरोग्याकडे आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. घरगुती उपाय केल्यामुळे मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळेल आणि पोट दुखीचा त्रास होणार नाही. शिवाय या बियांचे नियमित सेवन केल्यास चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा मिळण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: खजुराची चटणी शरीरात ऊर्जा वाढवते, हाडे मजबूत करते, या पद्धतीने बनवण्याचे 5 फायदे
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये भोपळ्याच्या बिया, काळे तीळ, सूर्यफुलाच्या बिया आणि मध मिक्स करून नियमित सेवन करावे. यामुळे मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो.
हे देखील वाचा: वाढतोय टेंशन? खा ‘हे’ खाद्यपदार्थ; डिप्रेशन होईल छूमंतर
भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्वचेसंबंधित आणि शारीरिक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन करावे. या बिया बाजारात सहज उपलब्ध होतात. या बियांमध्ये विटामिन ई आणि मॅग्नेशियम आढळून येते. विटामिन सी आणि इतर गुणकारी घटकांनी समृद्ध असलेले मध आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मध खाल्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. शिवाय या बियांच्या मिश्रणाचे सेवन केल्यामुळे स्ट्रेस हर्मिनस संतुलित राहतात.
काळ्या तिळांमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि विटामिन बी आढळून येते, शिवाय इतर पौष्टिक घटक आढळून येतात.हिवाळ्यामध्ये तापमानात वाढ झाल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. त्यामुळे शरीर नेहमी उबदार राहण्यासाठी काळ्या तिळाचे सेवन करावे. काळ्या तिळाचे सेवन सर्वच ऋतूंमध्ये केले जाते. मासिक पाळीतील वेदनांपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी काळे तीळ खावेत.