डोळ्यांखालील काळी वर्तुळ घालवण्यासाठी घरगुती उपाय
धावपळीच्या जीवनात अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सतत काम करणे इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे त्वचा आणि केसांचे सौंदर्य हळूहळू खराब होण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर काळी वर्तुळ दिसण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू सौंदर्य खराब होण्यास सुरुवात होते. हार्मोनल असंतुलन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी गोष्टींचा परिणाम लगेच चेहऱ्यावर दिसून येतो. अशावेळी अनेक महिला चेहऱ्याचे बिघडलेले सौंदर्य सुधारण्यासाठी अनेक उपाय करतात.
केमिकल ट्रीटमेंट, फेशिअल इत्यादी गोष्टी केल्यामुळे चेहरा काही दिवसांसाठी सुंदर दिसतो, मात्र कालांतराने त्वचेचा रंग आणि पोत खराब होण्यास सुरुवात होते. डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्यामागे काही कारणसुद्धा आहेत. त्यातील महत्वाची कारण म्हणजे रडणे, ऍलर्जी, थकवा, झोप न लागणे, डोळे चोळणे आणि तीव्र सूर्यप्रकाशात दीर्घकाळ बसून राहणे इत्यादी गोष्टींमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला डोळ्यांखालील काळी वर्तुळ घालवण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स नक्की फॉलो करून पहा. (फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: अंबाडीच्या बिया खाल्ल्याने फायद्यांऐवजी ‘या’ लोकांच्या आरोग्याचे होऊ शकते नुकसान
डोळ्यांखालील काळी वर्तुळ कमी करण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे फार गरजेचे आहे. शरीरात जर पाणीच नसेल तर आरोग्यसंबधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांखालील त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. डोळ्यांखालील त्वचा अधिक संवेदनशील आणि नाजूक असल्यामुळे त्वचा त्वचेला निरोगी, मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी हायड्रेशन फार गरजेचे असते.
डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी मॉइश्चरायझिंग रूटीन योग्य प्रकारे फॉलो केले पाहिजे. मॉइश्चरायझिंग रूटीनमध्ये त्वचेला सूट होईल अशा उत्पादनाचा वापर करावा. डोळ्यांखालील काळी वर्तुळ घालवण्यासाठी बाजारात मॉइश्चरायझिंग फेस क्रीम, मास्क, पॅचेस आणि सीरम इत्यादी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.
हे देखील वाचा: लांब, दाट आणि काळ्या केसांसाठी वरदान आहे ‘ही’ आयुर्वेदिक पावडर