
बोटॉक्स ट्रीटमेंटची कधीच भासणार नाही गरज! आजीबाईच्या बटव्यातील 'या' पदार्थाचा वापर करून चेहऱ्यावर आणा चमकदार ग्लो
हल्ली सुंदर दिसण्यासाठी सर्वच महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करून घेतात. महागडे क्रीम, सीरम, फेस ऑइल, ट्रीटमेंट्स याशिवाय अनेक गोष्टी केल्या जातात. प्रत्येक महिन्याला स्किन ट्रीटमेंटवर हजारो रुपये खर्च करतात. यामुळे काही काळ त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसते. पण कालांतराने त्वचा पुन्हा एकदा त्वचा रुक्ष होऊन जाते. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी, निस्तेज, डाग किंवा खड्डे पडल्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो कमी होऊन जातो. वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. या सुरकुत्या घालवण्यासाठी महिला महागडे बोटॉक्स ट्रीटमेंट करून घेतात. पण कालांतराने त्वचेसंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. वारंवार पार्लरमध्ये जाऊन महागड्या स्किन ट्रीटमेंट आणि फेशिअल करण्याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील ग्लो वाढण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
वारंवार केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता काहीशी खराब होऊन जाते. त्वचा कोरडी पडणे, पुरळ येणे, हायपरपिग्मेंटेशन वाढणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करावेत. आजीबाईच्या बटव्यातील अनेक पदार्थ त्वचा आणि केसांसाठी गुणकारी ठरतात. बाजारातील महागड्या ट्रीटमेंट किंवा स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करून घरीच फेसमास्क तयार करावा. फेसमास्क लावल्यामुळे चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो आणि त्वचा खूप जास्त सुंदर होते.
घरगुती बोटॉक्स फेस मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात एक चमचा मैदा घालून शिजवून घ्या. त्यानंतर त्यात कॉफी पावडर मिक्स करून क्रिमी कंसन्सिटी तयार करा. तयार केलेल्या मिश्रण खोबऱ्याचे तेल मिक्स करून घ्या. तयार केलेला फेसमास्क वाटीमध्ये काढून घ्या. थंड झालेली क्रीम संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा. ३० मिनिटं ठेवल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून टाका. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले हायपरपिग्मेंटेशन, सुरकुत्या कमी होऊन त्वचा उजळदार दिसेल. याशिवाय त्वचेच्या बऱ्याच समस्या कमी होण्यास मदत होईल.
भेगा पडलेल्या टाचांना एका रात्रीतच बरं कसं करायचं? घरच्या घरी या सोप्या उपायाने टाचांना बनवा मऊ
चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग, मुरूम, पिंपल्स कमी करण्यासाठी कोणत्याही महागड्या ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवावा. यामुळे त्वचा अतिशय सुंदर आणि नैसर्गिकरित्या ग्लोइंग दिसते. खोबऱ्याच्या तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होतो. कॉफी पावडरच्या वापरामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होऊन जाईल. आठवड्यातून दोनदा फेसमास्क चेहऱ्यावर लावल्यास त्वचा सुंदर होईल.