Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नखांवर चिटकून बसलेला हेअर डायचा रंग काढून टाकण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, नखं होतील स्वच्छ

नखांवर लागलेल्या मेहंदीच्या डागांमुळे नखं खराब होऊन जातात. नेलपेंट लावल्यानंतर सुद्धा नखं चांगली दिसत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नखांवर लागलेला डायचा रंग काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 18, 2024 | 09:46 AM
नखांना चिटकलेला हेअर डायचा रंग काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय

नखांना चिटकलेला हेअर डायचा रंग काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

पांढरे केस काळे करण्यासाठी महिला केसांना रंग किंवा डाय लावतात. यामुळे केस काही दिवसांपुरते काळेभोर आणि सुंदर दिसतात. पण पुन्हा एकदा केस पांढरे झाल्यानंतर केस काळे करण्यासाठी डाय लावला जातो. काही डाय लावण्यासाठी ब्रशचा वापर न करता हातांचा वापर करतात. यामुळे हेअर डाय संपूर्ण हाताला आणि नखांना लागतो. केसांना मेहंदी किंवा रंग लावल्यानंतर केस सुंदर आणि उठावदार दिसतात. पण नखांना लागलेले मेहंदी किंवा हेअर डायचे डाग लवकर निघून जात नाही. हेअर डायचा रंग नखांमध्ये तसाच चिटकून राहतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हेअर डायचा रंग चिटकून खराब झालेली नखं स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यामुळे नखांमधील हेअर डायचा रंग कायमचा निघून जाईल आणि नखं स्वच्छ होतील.(फोटो सौजन्य-istock)

स्किन केअर संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

नखांना चिटकलेला हेअर डायचा रंग काढून टाकण्यासाठी घरगुती उपाय:

साखरेचा वापर करावा:

नखांवर चिटकून राहिलेला हेअर डायचा रंग काढून टाकण्यासाठी साखरेचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये साखर घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण नखांना स्क्रब म्हणून लावा आणि हलक्या हाताने नखांवर मसाज करा. त्यानंतर काहीवेळ ठेवून झाल्यानंतर नखं पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय केल्यामुळे नखांवर लागलेला डाय निघून जाण्यास मदत होईल आणि नखं स्वच्छ होतील.

बेकिंग सोड्याचा वापर:

बेकिंग सोड्याचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. शिवाय यामध्ये असलेले गुणधर्म नखांवर लागलेले डाग काढून टाकण्यासाठी सुद्धा मदत करतील. वाटीमध्ये चमचाभर बेकिंग सोडा घेऊन त्यात पाणी टाकून जाडसर पेस्ट तयार करा. त्यानंतर तयार केलेली पेस्ट नखांवर लावून हलक्या हाताने चोळून घ्या. १५ मिनिटं झाल्यानंतर पाण्याने नखं स्वच्छ करून घ्या. हा उपाय केल्यामुळे नखांवर चिटकून राहिलेला डाय किंवा रंग निघून जाण्यास मदत होईल.

ऑलिव्ह ऑईल:

नखांवर चिटकून राहिलेला मेहंदीचा रंग काढून टाकण्यासाठी ऑलिव्ह ऑईल गुणकारी आहे. यासाठी वाटीमध्ये ऑलिव्ह ऑईल घेऊन त्यात मीठ टाकून मिक्स करा. त्यानंतर नखांवर लावून व्यवस्थित चोळून घ्या. यामुळे नखांवर लागलेला रंग किंव डाय निघून जाण्यास मदत होईल. त्यानंतर काहीवेळ नखांवर हे मिश्रण तसेच ठेवा आणि पाण्याने स्वच्छ धुवून टाका.

स्किन केअर संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

खोबरले तेलाचा वापर:

त्वचेसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबरेल तेल अतिशय गुणकारी आहे. या तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे नखांवरील किंवा त्वचेवरील डाग निघून जातात. खोबरेल तेल गरम करून कोमट झाल्यानंतर नखांवर लावून घ्या. १० मिनिटं तसेच ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे नखांवरील रंग निघून जाण्यास मदत होईल.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Home remedies to remove hair dye from nails nails care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 09:46 AM

Topics:  

  • home remedies
  • Nails

संबंधित बातम्या

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक हिरव्या पानांचा रस, मुळांपासून होतील काळेभोर सुंदर केस
1

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? ‘या’ पद्धतीने केसांवर लावा आयुर्वेदिक हिरव्या पानांचा रस, मुळांपासून होतील काळेभोर सुंदर केस

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट
2

Home Remedies: कोरियन महिलांप्रमाणे डागविरहित त्वचा हवी आहे? मग अंघोळीच्या १० मिनिटं आधी चेहऱ्यावर लावा ‘ही’ पेस्ट

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल
3

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब
4

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.