(फोटो सौजन्य – istock)
नववर्षाची सुरुवात करा रामाच्या दर्शनाने…IRCTC घेऊन आला बजेट फ्रेंडली पॅकेज
स्नॅक टुरिझमचे महत्त्व
भारतामध्ये स्नॅक टुरिझमला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामागे देशाची समृद्ध, विविध आणि सांस्कृतिक वारसा जपणारी स्ट्रीट फूड संस्कृती कारणीभूत आहे. गजबजलेले बाजार असोत किंवा शांत गल्ली, प्रत्येक ठिकाणी एखादा असा पदार्थ सापडतो जो त्या प्रदेशाचा इतिहास आणि परंपरा सांगतो.
इंदूर
इंदूरचा पोहे-जलेबीचा नाश्ता संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. भुट्ट्याची कीस आणि साबुदाणा खिचडीदेखील इथे आवर्जून चाखली जाते. सराफा बाजार आणि छप्पन दुकान ही या शहराची ओळख आहे.
अमृतसर
अमृतसरचे अमृतसरी कुल्चे, आलू टिक्की, पनीर पकोडे आणि दाटसर लस्सी यासाठी पर्यटक खास येतात. इथले स्ट्रीट फूड पंजाबी संस्कृतीचे खरे प्रतिबिंब आहे.
कोलकाता
पुचका, काठी रोल, झालमुरी आणि तेल भाजा यांसारखे स्नॅक्स कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीला वेगळी ओळख देतात. प्रत्येक घासात इथली परंपरा जाणवते.
अहमदाबाद
खाखरा, फाफडा-जलेबी, खांडवी आणि ढोकळा हे अहमदाबादचे खास शाकाहारी स्नॅक्स आहेत. साधेपणा आणि चव यांचा सुंदर मिलाफ इथे अनुभवायला मिळतो.
बेंगळुरू
डोसा, मेदू वडा, इडली, चटणी पुडी आणि मंगळूर बन हे बेंगळुरूचे लोकप्रिय स्नॅक्स आहेत. दक्षिण भारतीय चवींचा खरा आनंद इथे घेता येतो.
भारतातील एक असे मंदिर जिथे आजही देव आहे जिवंत; 150 पायऱ्यांनंतर होते देवाचे दर्शन
स्नॅक टुरिझम म्हणजे केवळ खाणे नाही, तर त्या शहराची संस्कृती, जीवनशैली आणि इतिहास एका निवाळ्यात अनुभवणे होय. स्ट्रीट फूड हे स्थानिक परंपरेतून तयार झालेले असते आणि अनेकदा त्या संस्कृतीवर प्रभावही टाकते. कोलकात्याचे पारंपरिक स्नॅक्स असोत किंवा अहमदाबादचे शाकाहारी पदार्थ, प्रत्येक शहराची स्वतःची एक खाद्यकथा असते. ती जाणून घेण्यासाठी स्नॅक टुरिझम हा एक प्रभावी आणि आनंददायी मार्ग ठरत आहे.






