Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…

Hotel Towels: आपण कधी हॉटेलमध्ये गेलो की सगळ्यात आधी काय बघतो? रूम कशी आहे, बाथरूम स्वच्छ आहे का? आणि बाथरूममध्ये असलेले जाड, मऊ, पांढरे शुभ्र टॉवेल. हे टॉवेल काही दिवसांनी जुने झाल्यावर त्यांचं काय होत असेल ? जाणून घ्या... 

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 21, 2026 | 11:30 AM
Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जुने टॉवेल साफसफाईच्या कामासाठी
  • चांगल्या स्थितीतील टॉवेल गरजू, धर्मादाय संस्था किंवा प्राणी निवारा केंद्रांना दान
  • पूर्णपणे जीर्ण टॉवेलचे रिसायकलिंग करून नवीन कापड
 

Hotel Towels: आपण कधी हॉटेलमध्ये गेलो की सगळ्यात आधी काय बघतो? रूम कशी आहे, बाथरूम स्वच्छ आहे का? आणि बाथरूममध्ये असलेले जाड, मऊ, पांढरे शुभ्र टॉवेल. हे टॉवेल हाताला मऊ असतात. पण कधी विचार केलाय का? हे टॉवेल काही दिवसांनी जुने झाल्यावर त्यांचं काय होत असेल ? त्यांना कचऱ्यात फेकून देतात का? तर नाही, एकही मोठं हॉटेलवाले जुने टॉवेल असे कचऱ्यात फेकत नाही. नेमकं ‘त्या’ टॉवेलचं काय जाणून घ्या… Hotel Towels:

टॉवेल जुने कसे होतात?

रोज शेकडो लोक तोच टॉवेल वापरतात. रोज धुतला जातो. गरम पाण्यात, केमिकलमध्ये धुतल्यामुळे काही महिन्यांतच तो टॉवेल पातळ होऊ लागतो. त्याचा पांढरेपणा कमी होतो, थोडा पिवळसर दिसू लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होते. अशा वेळी तो टॉवेल पाहुण्यांसाठी वापरता येत नाही. कारण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ग्राहकाला जुनं, पातळ टॉवेल देता येत नाही.पण याचा अर्थ तो टाकाऊ झाला असं नाही.

मग हॉटेलवाले काय करतात?

क्लीन इंडिया जर्नलनुसार, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जुन्या चादरी आणि टॉवेलचा परत वापर करण्यासाठी अनेक आयडिया वापरल्या जातात. जर टॉवेल थोडा जुना झाला असेल पण कापड अजूनही चांगलं असेल तर त्याला दुसऱ्या कामासाठी वापरतात. साफसफाईसाठी सगळ्यात जास्त वापर होतो . हॉटेलमधले कामगार तेच टॉवेल फाडून फडके बनवतात. मग त्या फडक्याने रूममधली धूळ पुसणे, काच पुसणे, फरशी पुसणे अशी कामं केली जातात. काही वेळा पेंटिंग किंवा काही रिपेअरचं काम चालू असेल तर खाली फरशीवर तेच टॉवेल अंथरतात जेणेकरून फरशी खराब होणार नाही.

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

दान पण करतात

प्रत्येक हॉटेलची पद्धत वेगळी असते. काही मोठी हॉटेल्स असे जुने पण चांगल्या स्थितीतले टॉवेल आणि चादरी गरजू लोकांना दान करतात. वॉशिंग्टन पोस्टच्या एका रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की काही हॉटेल्स त्यांचे जुने टॉवेल अनाथाश्रमाला किंवा धर्मादाय संस्थांना देतात. एका हॉटेल समूहाने तर प्राण्यांच्या निवारा केंद्राला जुने टॉवेल दान करण्याचा उपक्रम सुरू केला होता. तिथे कुत्र्या-मांजरांना थंडीपासून वाचवण्यासाठी या टॉवेलचा वापर होतो.

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

जेव्हा टॉवेल पूर्णपणे फाटतो तेव्हा काय?

जेव्हा टॉवेल अगदीच जीर्ण होतो, फाटून जातो, त्याचा अजिबात वापर होऊ शकत नाही तेव्हा त्याचा पुनर्वापर केला जातो. याला रिसायकलिंग म्हणतात.त्याचे छोटे तुकडे करून त्याच्या धाग्यांपासून परत नवीन काहीतरी बनवलं जातं. भारतात तर यासाठी एक खास उपक्रम पण सुरू आहे. हॉटेल आणि हॉस्पिटलमधले जुने टॉवेल, चादरी गोळा करून त्यांच्यापासून नवीन वस्तू बनवल्या जातात. जसं की पायपुसणी, गाडी पुसायचे फडके किंवा नवीन कापड तयार केले जाते. त्यामुळे पुढच्या वेळी हॉटेलमध्ये गेल्यावर त्या पांढऱ्या टॉवेलकडे बघून त्याच्या या लांब प्रवासाचा नक्की विचार करा.

Web Title: Hotel towels what happens to old towels reuse recycling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • hotel
  • lifesytle news
  • lifesytyle
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi:  मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
2

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
3

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
4

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.