ताज हॉटेल बनले जगातील सर्वात मजबूत हॉटेल
मुंबईतील ताज हॉटेल हे जगभरात आपली विशेष ओळख ठेऊन आहे. विशेष म्हणजे २००८ साली या हॉटेलवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यामुळे भारतच नाही संपूर्ण जग हादरले होते. मात्र, आता या हॉटेलच्या स्थापनेमागील कहाणी ऐकल्यास तुम्हीही म्हणाल, …क्या बात है! त्याला कारणही तसेच आहे. इंग्रजांनी टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांना एका हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला होता. ज्यानंतर अपमानाचा बदला घेत टाटा यांनी 1903 मध्ये ताज हॉटेलची उभारणी केली होती. मात्र, आता जवळपास सव्वाशे वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या याच ताज हॉटेलने जगातील सर्वात मजबूत हॉटेल यादीत प्रथम स्थान पटकावले आहे.
ताज हॉटेल ब्रँड प्रथम स्थानी
ब्रिटनच्या ब्रांड वैल्यूएशन कंसल्टेंसी ‘ब्रँड फायनान्स’ आपल्या वार्षिक अहवालात ताज हॉटेलला सर्वात मजबूत हॉटेल ब्रँडमध्ये प्रथम स्थान दिले आहे. ज्यामुळे आता एकेकाळी अपमान झालेल्या झालेल्या भारतीय व्यक्तीच्या ‘ताज’ हॉटेलची मजबूत ब्रँड म्हणून नवी ओळख तयार झाली आहे. जागतिक आकडेवारीनुसार, ताजचे नाव टॉप-१० सर्वात मजबूत हॉटेल ब्रँडमध्ये सर्वात वरती आहे.
(फोटो सौजन्य : istock)
‘ही’ आहेत टॉप १० हॉटेल
याशिवाय टॉप १० मजबूत हॉटेलच्या यादीमध्ये अमेरिकन हॉटेल्स दुसऱ्या ते पाचव्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेचे रेनेसान्स हॉटेल दुसऱ्या क्रमांकावर, डबल ट्री हॉटेल ब्रॅंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. एम्बेसी स्वीट्स हॉटेल चौथ्या क्रमांकावर तर मॅरियट हॉटेल पाचव्या क्रमांकावर आहे. याशिवाय सहाव्या क्रमांकावर चीनमधील शांघायमधील हँटिंग हॉटेल आहे. सातवे स्थान देखील चीननेच सातवे स्थान पटकावले असून, चीनचे जेआय हॉटेल सातव्या क्रमांकावर आहे. याशिवाय अमेरिकन हॉटेल हिल्टनने ८ व्या तर हाँगकाँगचे शांग्री-लाने ९ व्या जागेवर स्थान मिळवले आहे. तर स्वीडनचे स्कँडिक हॉटेल्स १० व्या स्थानावर आहे.
का बांधले गेले ताज हॉटेल?
भारतात अनेक शहरांमध्ये टाटा समूहाची अनेक हॉटेल्स बांधली गेली आहेत. मात्र, असे असले तरी मुंबईतील ताज हॉटेलच्या बांधकामाची व हॉटेल उभारणीची कहाणी अतिशय रंजक आहे. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा हे एकदा इंग्लंडला गेले होते. त्याकाळी त्यांना इंग्लंडमधील वॉटसन हॉटेलमध्ये राहण्यासाठी प्रवेश मिळाला नाही. भारतीय असल्याने त्यांना वॉटसन हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. या अपमानाचा बदला घेत भारतात टाटा यांनी हॉटेल ताजची उभारणी केली. आज हेच हॉटेल जगातील सर्वात मजबूत हॉटेल म्हणून समोर आले आहे.