भगवान शिव शंकराच्या भक्तीमध्ये लीन असतात अघोरी. त्यांचे वेश आणि त्यांचा अवतार अतिशय तीव्र असतो. शिवाच्या आराधनेत त्यांचे जीवन व्यथित होत असते तर शक्तीचे ते उपासक असतात. महाकुंभात देशातील अघोरी येत असतात. कसे बनतात अघोरी? तसेच कसे असते त्यांचे आयुष्य? आयुष्यभर तंत्र आणि मंत्रात असणाऱ्या अघोरींचे जीवन सत्य जाणून घ्या.
कशी असते अघोरसाधना? जाणून घ्या. ( फोटो सौजन्य - Social Media )
अघोरी साधू महाकुंभातील प्रमुख आकर्षण मानले जाते. अघोरी साधू तंत्र साधनेत लीन असतात. त्यांची तल्लीनता अतिशय तीव्र असते. अघोरींना भयानक साधूदेखील मानले जाते.
अघोर म्हणजे ज्यामध्ये भीती नसून फक्त सौम्यता आहे. सरलता असणारे हे अघोरी साधू दिसण्यामध्ये नक्कीच भयंकर असतात, परंतु त्यांचे हृदय साफ आणि स्वच्छ असते. त्यांच्या मनात जण कल्याणाची भावना असते.
अघोरी साधू कधीच कुणाकडून काही मागत नाहीत. ते त्यांचे आयुष्य मांस, स्मशान, शव आणि कफन यांच्यासोबत जगत असतात. अघोरी बनण्यासाठी काही टप्पे असतात, त्यांना पात्र करावे लागतात.
अघोरी बनण्यासाठी एका गुरुची आवश्यकता लागते. त्यांच्याकडून बीज मंत्र प्राप्त करावे लागते. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करावे लागते.
पुढे गुरु शिष्याच्या हाताला, गळ्यात आणि कमरेला काळा धागा बांधतो. तसेच अघोर साधनेच्या काही नियमांची ओळख करून देतो. तिसऱ्या टप्प्यात आपल्या आयुष्याची संपूर्ण रूपरेखा गुरूच्या चरणाशी वाहावी लागते. अनेक परीक्षांना पात्र करावे लागते. तसेच गुरु अघोरपंथाविषयी महत्वाची माहिती शिष्याला प्राप्त करून देतो.