नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठीचे बिगुल अखेर वाजले आहे. महानगरपालिकेने प्रभाग रचना जाहीर केली आहे. निवडणुकीत 111 नगरसेवक निवडण्यासाठी 28 प्रभाग असणार आहेत. जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत घोळ केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. चुकीच्या पध्दतीने वार्ड रचना करून एकसंघ असलेला रहिवाशी विभाग तोडून टाकले आहेत. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वर्चस्वासाठी प्रभाग रचनेत गंभीर चुका करण्यात आल्या आहेत. एकीकडे मतदार याद्यात घोळ घातला असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांसाठी प्रभाग रचनेतही निवडणूक आयोगाने चुका केल्या आहेत. त्यामुळे प्रभाग रचनेत सुधारना न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाने दिलाय.