Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१०० किलो वजनातून फिटनेस आयकॉनपर्यंत, प्रतीक यादवने लठ्ठपणाला कसे हरवले? जाणून घ्या परफेक्ट डाएट प्लॅन

समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचा छोटा मुलगा प्रतीक यादव याचे आज अकस्मात निधन झाले आहे. आपल्या फिटनेससाठी तो विशेष करून ओळखला जात होता.

  • By नुपूर भगत
Updated On: May 13, 2026 | 12:30 PM
१०० किलो वजनातून फिटनेस आयकॉनपर्यंत, प्रतीक यादवने लठ्ठपणाला कसे हरवले? जाणून घ्या परफेक्ट डाएट प्लॅन

१०० किलो वजनातून फिटनेस आयकॉनपर्यंत, प्रतीक यादवने लठ्ठपणाला कसे हरवले? जाणून घ्या परफेक्ट डाएट प्लॅन

Follow Us
Follow Us:
  • प्रतीक हा राजकारणी घराण्यातून होता.
  • जास्त वजनाला ग्रासलेल्या प्रतिकने मेहनतीने आपल्या वजन कमी केले.
  • फिटनेस आयकॉन म्हणून त्याला ओखळले जात होते.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात यादव घराणाचं मोठं नाव. यात घराण्यातील एक मुलाने सत्तेच्या राजकारणात सामील न होता फिटनेसकडे आपले लक्ष दिले. एकेकाळी लठ्ठपणाने ग्रासलेल्या प्रतीकने जिममध्ये घाम गाळत आपलं बरंच वजन कमी केलं आणि लठ्ठपणाला कसं हारवता येईल यासाठी तो नवीन आदर्श बनला. प्रतीक यादव हा समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचा छोटा मुलगा आहे. १३ मे रोजी सकाळी त्याचे अकस्मात निधन झाले.

प्रतीक यादवची शरीरयष्टी, फुगलेले बायसेप्स आणि एट-पॅक ॲब्स नेहमीच लोकांना आकर्षित करायचे. तुम्हाला माहित आहे का की, लखनौचा ‘आयर्न मॅन’ म्हणून म्हणून त्याला ओळखले जात होते. चला तर मग १०० किलो वजनातून फिटनेस आयकन बनण्यासाठी प्रतीकने नक्की काय केले ते सविस्तर जाणून घेऊया.

Hantavirus: नक्की कुठून सुरू झाला हंता व्हायरस? किती धोकादायक, या नावामागील काय आहे कहाणी

वजन बनली मोठी समस्या

प्रतीक यादवच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा त्याचे वजन १०३ किलोपेक्षा जास्त होते. शाळेच्या काळात त्याचे वजन खूप जास्त होते ज्यामुळे त्याला गोलू या नावाने चिडवले जायचे. हा प्रश्न फक्त दिसण्याचा नव्हता तर याचा त्याच्या आरोग्यावरही परिणाम होत होता. जास्त वजनामुळे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे त्याला न्यूमोनिया झाला. त्याची प्रकृती इतकी जास्त ढासळली की त्याला स्टेरॉइड्सचे जास्त डोस घ्यावे लागले, ज्याचा त्याच्या शरीरावर हानिकारक परिणाम झाला.

प्रतीक यादवने एका मुलाखतीत सांगितले की, एके दिवशी त्याने आरशात स्वतःकडे पाहिले आणि ठरवले की आता पुरे झाले. त्याने आपल्या कमकुवतपणालाच आपली सर्वात मोठी ताकद बनवण्याचा निश्चय केला. त्याने स्वतःला वचन दिले की तो केवळ वजन कमी करणार नाही, तर एक चांगली शरीरयष्टीही घडवेल.

अशा प्रकारे परिवर्तन करण्यात आले

प्रतीक तासनतास आपला वेळ जीममध्ये घालवायचा. तिथे कठोर परिश्रम करुन, घाम गाळून त्याने आपले वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले.
व्यायामासोबतच प्रतीकने आपल्या आहाराकडेही विशेष लक्ष दिले. त्याने गोड पदार्थ, जंक फूड आणि तेलकट पदार्थांना पूर्णपणे रामराम ठोकला.
याउलट आपल्या आहारात त्याने प्रथिने आणि नैसर्गिक पदार्थांचा अधिक समावेश केला. घरात समांरभ असो वा काही महत्त्वाचे काम, त्याने आपले जिम रुटीन कधीही मोडले नाही.

जागतिक ब्लड प्रेशर दिन 2026: डोकेदुखीपासून छातीत दुखण्यापर्यंत; उच्च रक्तदाबाची लक्षणे ओळखा आणि वेलेटी स्वतःला वाचवा

जेव्हा जगाने एक ‘नवीन प्रतीक’ पाहिले

या सर्व गोष्टी नित्यनियमाने फाॅलो करुन प्रतीकने आपले ३० किलो वजन कमी केले. या यशाने त्याला इतकी प्रेरणा दिली की, त्याने लखनौमध्ये ‘द आयर्न कल्ट’ नावाची एक जागतिक दर्जाची व्यायामशाळा उघडली. तिथे तो स्वतः लोकांना प्रशिक्षण देत होता. त्याने तरुणांना अमली पदार्थांसारख्या वाईट सवयींऐवजी फिटनेसकडे अधिक लक्ष देण्यास प्रोत्साहित केले.

 

Web Title: How prateek yadav transformed himself from 100 kg overweight boy to lucknow fitness icon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • fitness secret
  • lifestyle news
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
2

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?
4

UP Election 2027: जागावाटपावरून राजकारण तापले! काँग्रेसची 150 जागांवर नजर; सपा-काँग्रेसच्या जागावाटपात वाढणार तिढा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.