Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

wedding skincare : लग्नापूर्वी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कशी घ्याल विशेष काळजी? जाणून घ्या सोप्या टिप्स

wedding skincare : प्रत्येक नववधूला लग्नाच्या दिवशी आपली त्वचा निरोगी, सुंदर आणि चमकदार दिसावी असे वाटते. यासाठी लग्नाच्या किमान महिनाभर आधीपासून त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. महागड्या सौंदर्यप्रसाधनांपेक्षा नियमित स्किनकेअर दिनचर्या अधिक महत्त्वाची ठरते.

  • By Siddhi Berde
Updated On: Nov 18, 2026 | 01:20 PM
लग्नापूर्वी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कशी घ्याल विशेष काळजी? जाणून घ्या सोप्या टिप्स (फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

लग्नापूर्वी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कशी घ्याल विशेष काळजी? जाणून घ्या सोप्या टिप्स (फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:
  • लग्नापूर्वी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सोप्या टिप्स
  • योग्य स्किनकेअरचा कशा वापर कराल
  • आहाराची मुख्य भूमिका कोणती?
wedding skincare: प्रत्येक नववधूला तिच्या लग्नाच्या दिवशी तिची त्वचा निरोगी,सुंदर आणि चमकदार अशी दिसावी इच्छा असते. ती त्वचा निरोगी राहण्यासाठी,लग्नाच्या अगदी आधी नवीन सौंदर्य वस्तूंचा आणि उपचारांचा प्रयोग केला जातो. त्यापेक्षा किमान महिनाभर आधीपासून त्वचेची उत्तम काळजी घेणे गरजेचे असते. या काळात, आपल्या चेहऱ्याला अतिवापरापासून वाचवा आणि नियमित काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करा . सुंदर त्वचेसाठी महागड्या सौंदर्य उत्पादनांपेक्षा ,योग्य दिनचर्या नेहमीच महत्वाची ठरते. (wedding skincare)

योग्य स्किनकेअरचा वापर करा

तुमच्या दिनक्रमाची ची सुरुवात त्वचा स्वच्छ करून करा. तुमच्या त्वचेच्या प्रकाराला योग्य असा सौम्य फेस वॉश निवडा. त्यानंतर सकाळी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन त्वचेवर लावा. कोरड्या त्वचेसाठी क्रीम-आधारित मॉइश्चरायझर अधिक योग्य ठरू शकते, तर तेलकट त्वचेसाठी हलका, जेल-आधारित पर्याय अधिक चांगला ठरू शकतो. रात्रीसुद्धा चेहरा स्वच्छ करून मॉइश्चरायझर लावा. जेणेकरून त्वचेमधील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

Skin Care Tips: दिवसातून अनेक वेळा चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले की वाईट? जाणून घेऊया तज्ज्ञांनी दिलेला महत्वपूर्ण सल्ला

आहाराची भूमिका

दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करत रहा . ज्यामुळे तूंची त्वचा सजल राहील . त्याचबरोबर केवळ बाह्य काळजीने तुमची त्वचा निरोगी राहत नाही; आहाराचीही त्यात महत्त्वाची भूमिका असते. आपल्या जेवणात मोसमी फळे, हिरव्या भाज्या, कडधान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. तसेच संत्री, पेरू आणि आवळा यांसारखी व्हिटॅमिन सी ने युक्त असलेली फळे खाण्याचा प्रयत्न करा. साखरयुक्त पेय, सोडा व तळलेले पदार्थ यांचे सेवन करणे टाळा.

रात्रीचा दिनक्रम

जसे दिवसभर त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे रात्री त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. त्यासाठी झोपण्यापूर्वी मेकअप पूर्णपणे काढून टाकणे महत्त्वाचे आहे. यासाठी मेकअप रिमूव्हर किंवा क्लिन्झर वापर करावा . त्यानंतर, चेहरा स्वच्छ धुवा आणि मॉइश्चरायझर लावा. जर तुमच्या त्वचेला व्हिटॅमिन सी असलेले उत्पादन आधीपासूनच मानवले असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचा वापर सुरू ठेवू शकता. त्वचेची नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रिया रात्रीच्या वेळी होते, त्यामुळे पुरेशी झोप घेणे देखील आवश्यक आहे.

Amla Candy Recipe: कच्चा आवळा खायला अजिबात आवडत नाही? मग ‘या’ पद्धतीने घरी बनवा टेस्टी आवळा कँडी

💡

Frequently Asked Questions

  • Que: लग्नाच्या अगदी आधी नवीन स्किनकेअर उत्पादने वापरावीत का?

    Ans: नाही. लग्नाच्या अगदी आधी नवीन उत्पादने किंवा त्वचेवरील उपचार करून पाहणे टाळावे. यामुळे काही व्यक्तींना त्वचेची जळजळ, लालसरपणा किंवा ॲलर्जी होऊ शकते.

  • Que: नववधूने त्वचेच्या काळजीसाठी कोणता आहार घ्यावा?

    Ans: आहारात मोसमी फळे, हिरव्या भाज्या, कडधान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. तसेच पुरेसे पाणी प्यावे.

  • Que: ५. रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी कशी घ्यावी?

    Ans: झोपण्यापूर्वी मेकअप पूर्णपणे काढून चेहरा स्वच्छ करावा आणि मॉइश्चरायझर लावावे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी दररोज पुरेशी झोप घेणेही महत्त्वाचे आहे.

Web Title: How should you take special care to keep your skin healthy before your wedding sb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • LIFESTYLE
  • marriage

संबंधित बातम्या

Health Update: ऑल इज वेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला NABL मानांकन; मध्य भारतातील निदान आरोग्यसेवेला मिळणार अधिक बळ
1

Health Update: ऑल इज वेल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला NABL मानांकन; मध्य भारतातील निदान आरोग्यसेवेला मिळणार अधिक बळ

Rahul Gandhi Girlfriend News: केंब्रिजमध्ये भेटलेली प्रेयसी..! राहुल गांधीनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख
2

Rahul Gandhi Girlfriend News: केंब्रिजमध्ये भेटलेली प्रेयसी..! राहुल गांधीनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख

बाळ जन्माला येताच रडतंच का? हसत का नाही? जाणून घ्या यामागचं क्रेझी लॉजीक आणि सायन्स  
3

बाळ जन्माला येताच रडतंच का? हसत का नाही? जाणून घ्या यामागचं क्रेझी लॉजीक आणि सायन्स  

Good Morning Messages: दिवसाची सुरुवात करा सकारात्मक आणि आनंदी विचारांनी! प्रियजन आणि नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
4

Good Morning Messages: दिवसाची सुरुवात करा सकारात्मक आणि आनंदी विचारांनी! प्रियजन आणि नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.