Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parenting Tips: तुमच्या मुलांचा Confidence वाढवायचा आहे का? सोप्या टिप्स

आपल्या मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी पालकांनी सतर्क राहणे खूपच गरजेचे आहे. हा आत्मविश्वास वाढविण्यासाठी पालकांनी नक्की काय करायला हवे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे समजून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 02, 2026 | 06:25 PM
मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी पालकांनी काय करावे 
  • पालकांसाठी काही सोप्या टिप्स 
  • मुलांना कोणत्या गोष्टी शिकवल्या तर आत्मविश्वास वाढू शकतो 
Confidence हा काही कोणाला जन्मतः येत नाही, तो रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतो. विशेषतः याची सुरूवात ही अगदी आपलं मूल लहान असते तेव्हाच पालकांनी करून द्यायची असते. आता म्हणजे नक्की काय? पालक म्हणून आपण मुलांचा आत्मविश्वास नक्की कसा वाढवायचा आणि त्यासाठी काय सोप्या ५ गोष्टी करता येतील हेच आज आपण या लेखातून जाणून घेऊया. यासाठी तुम्ही आमच्या नवराष्ट्र लाइफस्टाइल पेजवरील व्हिडिओदेखील पाहू शकता आणि फॉलो करू शकता.  

मुलांना काय शिकवावे 

जेव्हा आपण मुलांना छोटे निर्णय घेऊ देतो, त्यांच्या Effort चे कौतुक करतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांच्यासोबत Quality Time घालवतो, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास नैसर्गिकरित्या वाढतो. लक्षात ठेवा, आज तुम्ही वापरलेले शब्द आणि दिलेले प्रोत्साहन उद्या तुमच्या मुलाचा Inner Voice बनू शकतात. 

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलांना स्वतःचे निर्णय स्वतःच घेऊ द्या. अगदी लहानपणापासून तुम्ही ही त्यांना सवय लावा. उदाहरणच द्यायचे झाले तर कोणते कपडे निवडायचे इथपासून ते कोणते पुस्तक वाचायचे असे साधे साधे निर्णय निवड त्यांना करू द्या. यामुळे त्यांचे स्वावलंबन वाढते आणि स्वतःच्या निर्णयावरचा विश्वास वाढून जबाबदारीही कळते 

Parenting Tips: गर्दीत मूल हरवल्यास त्याला तुम्ही काय शिकवून ठेवायला हवं, कसे ठेवाल मुलांना सुरक्षित

प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे 

मुलांच्या प्रयत्नांचे कौतुक करायला विसरू नका. त्यांना डोक्यावर बसवू नका पण तू खूप हुशार आहेस असं सांगण्यापेक्षा तू जे काही केलंस त्यासाठी चांगले प्रयत्न केलेस, मेहनतीतून यश मिळते हे त्यांना कळू द्या आणि परिणामाचा विचार करण्यापेक्षा प्रयत्न महत्त्वाचे हे शिकवा 

स्वतःच्या समस्या सोडविण्याची संधी 

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना स्वतःच्या समस्या आधी स्वतःच सोडविण्याची संधी द्या. त्यांना एखादी समस्या असेल तर त्वरीत उपाय देऊ नका तर त्यांना विचारा की, तुला काय वाटतं यावर आपल्याला काय करता येईल? तू ही परिस्थिती कशी हाताळशील? यातून आपण कसा मार्ग काढू शकतो? याची उत्तरं पालकांना माहीत असतात पण मुलांना तुम्ही हे प्रश्न विचारल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि मुलं स्वतः उपाय शोधायलाही शिकतात 

जबाबदारी नक्की द्या 

मुलांचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर त्याला स्वतःहून जबाबदारी द्या. तुला हे कळणार नाही, तुला हे येणार नाही असं न सांगता स्वतःची खेळणी जागेवर ठेव, झाडांना पाणी घाल, शाळेची बॅग भर, जेवणाचं ताट उचल हे साधंसोपं करायला सांगा. यामुळे आपण हे सर्व करू शकतो हा आत्मविश्वासाचा पाय त्यांना मिळतो

मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी 7 गोष्टी करा रूटीनमध्ये समाविष्ट, ऑलराऊंडर होईल

मुलांशी संवाद साधा 

सर्वात शेवटचं म्हणजे त्यांच्या आत्मविश्वासासाठी त्यांना पालक म्हणून दिवसातून किमान १० मिनिट्स वेळ द्या. त्यांच्याशी संवाद साधा. मोबाईल बाजूला ठेऊन गप्पा मारा. त्यांच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी व्हा. त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्या. यामुळे तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे, काळजी आहे हे त्यांना जाणवते आणि ते अधिक आत्मविश्वासू होतात हे लक्षात घ्या

मुलांचा आत्मविश्वास वाढला तर त्यांचे भविष्यही उज्ज्वल होते त्यामुळे पालक म्हणून हे नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि नवराष्ट्रला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका 

Web Title: How to boost your child confidence parenting tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • lifestyle news
  • parenting tips
  • tips for parenting

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
2

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
3

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist
4

कोरड्या त्वचेची घ्या एस्ट्रा काळजी, अशाप्रकारे नारळाच्या पाण्यापासून तयार करा Face Mist

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.