Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baby Care: थंडीच्या दिवसांत Premature बाळाची काळजी घेण्याची पद्धत, सर्दी – खोकल्याचा धोका टाळण्यासाठी काय करावे

प्रिमॅच्युअर मुलांची अधिक काळजी घ्यावी लागते आणि पावसाळा अथवा हिवाळ्यात त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावे लागते. ही मुलं अत्यंत नाजूक असतात, त्यामुळे तज्ज्ञांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 23, 2026 | 10:48 AM
प्रिमॅच्युअर बाळाची काळजी थंडीत कशी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)

प्रिमॅच्युअर बाळाची काळजी थंडीत कशी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रिमॅच्युअर बाळांची काळजी
  • हिवाळ्यात बाळांची काळजी घेण्यासाठी काय करावे 
  • तज्ज्ञांचा सल्ला नक्की वाचा 
अकाली जन्मलेली (प्रीमॅच्युअर) बाळे ही सर्वसामान्य बाळांच्या तुलनेत अधिक नाजूक असतात. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता देखील कमीच असते. त्यामुळे हिवाळ्यात अशा बाळांची विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते.

हिवाळ्यात थंडीमुळे अकाली जन्मलेल्या बाळांना सर्दी, खोकला, न्यूमोनिया यांसारख्या श्वसनविकारांचा धोका असतो. यासोबतच शरीराचे तापमान कमी होणे (हायपोथर्मिया) सारखी गंभीर समस्या उद्भवू शकते. त्यामुळे बाळाला योग्य उब मिळेल याची काळजी घेणे गरजेचे महत्त्वाचे आहे.  डॉ. बॉबी सदावर्ती, बालरोग व नवजात शिशु तज्ज्ञ, ॲलर्जिस्ट आणि स्तनपान तज्ज्ञ, एम्स हॉस्पिटल, डोंबिवली यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे, जाणून घेऊया. 

पालकांसाठी मोठी चिंतेची बाब

केवळ प्रौढांनाच नाही, तर अकाली जन्मलेल्या बाळांनाही हिवाळ्यात आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. अकाली जन्मलेली बाळे ३७ आठवड्यांच्या गर्भधारणेपूर्वी जन्माला येतात आणि त्यांचे अवयव व रोगप्रतिकारक प्रणाली पूर्णपणे विकसित झालेली नसते. हिवाळ्यात, तापमानातील घट आणि संसर्गातील वाढ यामुळे या बाळांना अधिक धोका असतो. या बाळांना ॲलर्जी, त्वचेच्या समस्या आणि सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास यांसारख्या श्वसनविकारांचाही त्रास होऊ शकतो. हे नवीन पालकांसाठी चिंताजनक ठरु शकते.

वय फक्त 23 आठवडे, वजन 550 ग्रॅम; बाळाची मृत्यूशी झुंज, 100 दिवस ICU मध्ये उपाय अन्…

अकाली जन्मलेल्या बाळांमधील हिवाळ्यातील सामान्य समस्या

हिवाळ्याच्या काळात अकाली जन्मलेल्या बाळांना अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ही बाळे खूप नाजूक असतात, कारण त्यांच्या शरीरावर चरबी कमी असते आणि त्वचा पातळ असते. त्यामुळे या बाळांना लवकर थंडी वाजते. अगदी थोडा वेळ थंड हवेत गेल्यासही त्यांच्या शरीराचे तापमान अचानक कमी होऊ शकते.

थंड हवा अकाली बाळांच्या नाजूक श्वसनमार्गांना त्रास देऊ शकते. त्यामुळे ब्रॉन्किओलायटिस, सर्दी, फ्लू, न्यूमोनिया आणि रेस्पिरेटरी सिंशियल व्हायरस (RSV) यांसारख्या श्वसनविकारांचा धोका अधिक वाढतो. याशिवाय हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, त्वचेला भेगा पडू शकतात आणि त्यामुळे त्वचेच्या संसर्गाची शक्यता देखील वाढते.

वेळेच्या अगोदरच होतेय गर्भधारणा! भारतात हा प्रकार वाढीस का? जाणून घ्या

बाळाची काळजी घेण्यासाठी टिप्स 

  • बाळाला संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घाला. मऊ सुती कपड्यांसोबत लोकरीची टोपी, मोजे आणि हातमोजे वापरा. मात्र, बाळाला गरजेपेक्षा जास्त उष्णता निर्माण करणाऱ्या कपड्यांचा वापर करणे टाळा
  • कांगारू मदर केअर (आई आणि बाळाचा त्वचेचा थेट संपर्क) ही पद्धत बाळाच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत करते आणि आई-बाळातील नातेसंबंध अधिक दृढ करते
  • बाळाची खोली स्वच्छ आणि हवेशीर ठेवा, मात्र थंड हवा थेट बाळावर येणार नाही याची काळजी घ्यावी. किमान ३ महिने घरात पाहुण्यांची ये-जा टाळावी आणि अकाली बाळाला घराबाहेर, गर्दीच्या ठिकाणी नेणे शक्यतो टाळा
  • डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळापत्रकानुसार बाळाला दूध पाजावे. नियमित दूध पाजल्यामुळे बाळाचे शरीर गरम राहते आणि वजन वाढण्यास मदत होते
  • बाळाची त्वचा कोरडी होऊ नये म्हणून सौम्य, सुगंधरहित मॉइश्चरायझरचा वापर करा
  • जर बाळाला सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास, दूध न पिणे किंवा अस्वस्थता अशी लक्षणे दिसली, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रिमॅच्युअर बाळ म्हणजे काय?

    Ans: 9 महिन्याच्या आत साधारण 7 व्या महिन्यात जन्म झालेल्या बाळाला प्रिमॅच्युअर बाळ म्हणतात

  • Que: यांना कोणता धोका असतो?

    Ans: 2 महिने आधी जन्माला आल्यामुळे या बाळांना खूपच जपावं लागतं आणि त्यांची विशेष आणि अधिक काळजी घ्यावी लागते

  • Que: थंडीत काय त्रास होऊ शकतो?

    Ans: या बाळांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने कोणताही आजार त्यांना पटकन होऊ शकतो. ताप, सर्दी अथवा खोकलाही लवकर होऊ शकतो. त्यामुळे त्यांची अधिक चांगल्या पद्धतीने काळजी घ्यावी लागते

Web Title: How to care for a premature baby during the winter months and what to do to avoid the risk of colds coughs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • baby care tips
  • Health Tips
  • Winter Care

संबंधित बातम्या

शरीरात सडलेली घाण त्वरीत बाहेर फेकेल ‘ही’ औषधी वनस्पती! आयुर्वेदातील अमृत, आजार राहतील चार हात लांब
1

शरीरात सडलेली घाण त्वरीत बाहेर फेकेल ‘ही’ औषधी वनस्पती! आयुर्वेदातील अमृत, आजार राहतील चार हात लांब

Explainer: महिलांपेक्षा पुरुषांवर Attack का करतात कुत्रे? कसा वाचवाल जीव
2

Explainer: महिलांपेक्षा पुरुषांवर Attack का करतात कुत्रे? कसा वाचवाल जीव

Metabolic Syndrome काय आहे? Metabolism उत्तम ठेवण्याला द्या प्राधान्य, Thyroid आरोग्‍य राहील परफेक्ट
3

Metabolic Syndrome काय आहे? Metabolism उत्तम ठेवण्याला द्या प्राधान्य, Thyroid आरोग्‍य राहील परफेक्ट

गुडघेदुखीला करा आता राम राम! ‘या’ औषधी वनस्पतीने शरीराच्या सर्व वेदना होतील दूर; रात्रीही लागेल शांत झोप
4

गुडघेदुखीला करा आता राम राम! ‘या’ औषधी वनस्पतीने शरीराच्या सर्व वेदना होतील दूर; रात्रीही लागेल शांत झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.