Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुनी, काळी पडलेली सोन्याची ज्वेलरी नव्यासारखी चमवायची आहे? मग या होम ट्रिकचा वापर करा आणि घरीच दागिन्यांची शाईन वाढवा

वाढत्या सोन्याच्या किंमतींमुळे लोक जुने दागिनेच पुन्हा वापरण्यावर भर देत आहेत. पण काळानुसार दागिन्यांची चमक कमी होते. अशावेळी काही सोपे घरगुती उपाय वापरून दागिन्यांना पुन्हा नव्यासारखी झळाळी देता येऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 22, 2026 | 11:50 AM
जुनी, काळी पडलेली सोन्याची ज्वेलरी नव्यासारखी चमवायची आहे? मग या होम ट्रिकचा वापर करा आणि घरीच दागिन्यांची शाईन वाढवा

जुनी, काळी पडलेली सोन्याची ज्वेलरी नव्यासारखी चमवायची आहे? मग या होम ट्रिकचा वापर करा आणि घरीच दागिन्यांची शाईन वाढवा

Follow Us
Follow Us:
  • घरातील नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने दागिने स्वच्छ करण्याचा सोपा उपाय समोर आला आहे.
  • काही मिनिटांत जुन्या दागिन्यांची चमक वाढवण्यासाठी खास घरगुती मिश्रणाचा वापर केला जातो.
  • योग्य पद्धतीने साफसफाई केल्यास दागिने अधिक स्वच्छ आणि आकर्षक दिसू शकतात.
भारतात सोन्याच्या दागिन्यांचे शाैकीन अनेक आहेत. हेच कारण आहे की देशात सर्वात जास्त सोन्याची खरेदी केली जाते. मागील काही काळापासून सोन्याचे वाढते भाव पाहता सोनं खरेदी करणं सामान्यांसाठी कठीण झालं आहे. वाढत्या सोन्याच्या भावामुळे लोक आत जुन्याच सोन्याच्या दागिन्यांनी खुश होत आहेत. दागिने जुने झाले की ते काळे पडू लागतात, त्यांची चमक कमी होऊ लागते पण अशावेळी सोनाऱ्याच्या दुकानात जाऊन या दागिन्यांना पाॅलिश केले जाते. ही प्रोसेस सर्वांना ठाऊक आहेच पण हे देखील खरं आहे की यात आपले बरेच पैसे खर्च होतात. विनामूल्य कोणत्याही खर्चाशिवाय जर तुम्हाला जुन्या सोन्याच्या दागिन्यांना नव्यासारखी चमक द्यायची असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.

चेहरा टॅन होतोय? उन्हाळ्यात सनस्क्रिनचं काम करतील ही फळं, फक्त अशाप्रकारे करा वापर

आम्ही तुम्हाला सांगतो की, आज या लेखात तुमच्यासोबत असा घरगुती हॅक शेअर केला जात आहे ज्याच्या मदतीने घरबसल्या जुन्या दागिन्यांना नव्यासारखी चमक देता येऊ शकते. यामुळे तुमचे पैसेही वाचतील आणि जुन्या दागिन्यांनाच नवे समजून तुम्ही त्याचा आनंद मिरवू शकता. चला यासाठी नक्की काय करावं लागेल ते जाणून घेऊया.

या पाण्याचा करा वापर

कंटेट क्रिएटर पूनम देवनानीने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक सोपा घरगुती हॅक शेअर केला आहे ज्याच्या मदतीने जुन्या दागिन्यांना नव्यासारखी चमक मिळवून देता येऊ शकते. ही ट्रिक पूर्णपणे सेफ आहे आणि यात कोणतेही नुकसान होण्याची शक्यता नाही. यासाठी आपण रिठा आणि हळदीचा वापर करणार आहोत.

  • हा एक नैसर्गिक पर्याय आहे ज्याच्या मदतीने दागिन्यांची नवी चमक मिळवता येऊ शकते.
  • यासाठी रिठा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा.
  • सकाळी मऊ झालेल्या रीठातील बी काढा आणि याला कुस्करुन घ्या.
  • या पण्यातच आता हळदीची पावडर मिक्स करा आणि तुमचा क्लिनर तयार झाला आहे.
दागिने कसे साफ करायचे?

आता या पाण्याच्या मदतीने दागिने साफ करण्यासाठी पाण्याच्या भांड्यात दागिन्यांना काही काळ भिजवून ठेवा. या पाण्यात तुम्ही डायमंड किंवा कोणत्या मणी देखील टाकून त्याला क्लिन करु शकता. १०-१५ मिनिटे दागिने पाण्यात ठेवल्यानंतर टुथब्रशच्या मदतीने दागिन्यांना हलकं घासा जेणेकरुन सर्व घाण निघून जाईल. यानंतर स्वच्छ पाण्याने दागिने पुन्हा साफ करुन घ्या.

रेल्वेत नेहमी निळ्या रंगाच्या सीट्स का असतात? रंगामागचं हे तथ्य तुम्हाला माहिती आहे का?

दुसरा पर्याय?

दागिने साफ करण्यासाठी तुम्ही आणखी एका पर्यायाची मदत घेऊ शकता. यासाठी चहापावडर, लिंबू, मीठ आणि चिमूटभर बेकिंग सोडा गरम पाण्यात मिसळा. यानंतर पाण्यात तुमचे सोन्याचे दागिने काही वेळ टाकून ठेवा आणि टूथब्रशच्या मदतीने त्यांना थोडं घासून घ्या. लक्षात घ्या दागिन्यांवर कोणताही मणी नसावा नाहीतर तो गळून पडण्याची शक्यता आहे.

 

Web Title: How to clean old gold jewellery at home naturally with easy tips and hacks lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • cleaning tips
  • Gold Jewellery
  • lifestyle news

संबंधित बातम्या

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
1

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

Crime News: काही तासांत तीन महिलांना लुटले; गोल्ड लोनच्या माध्यमातून चार लाखांची उचल, सहा गुन्हे उघडकीस
2

Crime News: काही तासांत तीन महिलांना लुटले; गोल्ड लोनच्या माध्यमातून चार लाखांची उचल, सहा गुन्हे उघडकीस

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
3

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी
4

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.