Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम

How To Control High Blood Pressure : आजच्या काळात हाय ब्लड प्रेशर कोणत्या सायलंट किलरहून कमी नाही. याला नियंत्रणात करायचे असेल तर औषध नाही तर काही फायद्याच्या सवयींच्या आपल्या जीवनशैलीत समावेश करा.

  • By नुपूर भगत
Updated On: May 16, 2026 | 11:22 AM
Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा 'हे' काम

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा 'हे' काम

Follow Us
Close
Follow Us:
  • रोजच्या काही छोट्या सवयी बदलल्यास गंभीर आरोग्य समस्यांचा धोका कमी होऊ शकतो.
  • आहार, वजन आणि जीवनशैलीकडे दुर्लक्ष केल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.
  • तज्ञांच्या मते, नियमित काळजी घेतल्यास भविष्यातील अनेक आरोग्यधोके टाळता येऊ शकतात.
आजच्या जीवनात उच्च रक्तदाबाची समस्या आजारांचे प्रमुख कारण बनली आहे. यामुळे हृदयविकार, स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी होणे आणि डोळ्यांचे नुकसान यांसारख्या गंभीर समस्या वाढू शकतात. मागील काही काळापासून हाय ब्लड प्रेशरची समस्या एक सायलंट किलरप्रमाणे काम करत आहे. प्रत्येक १० लोकांपैकी २ जणांमध्ये ही समस्या प्रामुख्याने आढळून येते ज्यामुळे याविषयीची सविस्तर माहिती असणे महत्त्वाचे ठरते. तुम्हाला माहिती आहे का? कोणत्याही औषधाचे सेवन न करता तुम्ही उच्च रक्तदाबाच्या समस्येला रोखू शकता. यासाठी फक्त आपल्या आहारात काही विशेष बदल करण्याची आवश्यकता आहे. खाली दिलेल्या काही सवयी रोजच्या आयुष्यात फाॅलो केल्यास तुम्ही नक्कीच या आजारापासून आपल्या शरीराचे संरक्षण करु शकता.

अचानक जास्त घाम येतोय? ही असू शकते धोक्याची घंटा, शरीर देतोय ‘या’ आजारांचे संकेत

दररोज ब्लड प्रेशर तपासत राहा

कोणतीही समस्या वेळेत ओळखली तर त्यावर लवकर उपचार घेता येतात ज्यामुळे धोका आणखी वाढत नाही. ब्लड प्रेशर नेहमीच बदलत असते त्यामुळे दररोज न चुकता आपल्या शरीराचे ब्लड प्रेशर चेक करत राहा. जर पुरेशी झोप आणि आराम करुनही ब्लड प्रेशर वाढत असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका आणि वेळीच डाॅक्टरांचा सल्ला घ्या.

वजनावर लक्ष ठेवा

वाढते वजन अनेक समस्यांना आमंत्रण देत असते. हाय ब्लड प्रेशर देखील यामधील एक समस्या आहे जी वाढत्या वजनामुळे अधिकाधिक वाढू शकते. यामुळेच जर तुम्ही जर या समस्येने ग्रासले असाल तर सुरुवातील आपल्या वजनावर लक्ष द्या आणि ते नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. हेल्दी डाएट आणि व्यायाम केल्याने वजन कमी करता येते.

हेल्दी पदार्थ

हाय ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी आपल्या आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. यासाठी अशा पदार्थांचा समावेश करा जे इंन्सुलिन बॅलेन्स ठेवण्यास मदत करतात जसे की, हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, शेंगा, कमी साखरेयुक्त फळे आणि मासे. योग्य आहार ब्लड प्रेशरला कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करतो.

जास्त मीठ टाळा

तज्ञांच्या मते, आहारात कधीही मीठाचे अतिसेवन नसावे. चिप्स, चिवडा या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे त्यांचे कमी सेवन करा. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, एका व्यक्तीने दिवसाला ६ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. यामुळे शरीरात पाणी साठून राहते ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.

मद्यापान आणि धूम्रपान

तुम्हाला मद्यापान आणि धूम्रपानाची सवय असेल तर आजपासूनच ती बंद करा. ही सवय फक्त रक्तदाबच वाढवत नाही तर आरोग्यासाठी घातक देखील ठरते. यामुळे तुम्ही तुमच्या मृत्यूला अधिक जवळ करत असता. या दोन सवयींना टाळल्यास हळूहळू तुमचे ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होईल.

अचानक जास्त घाम येतोय? ही असू शकते धोक्याची घंटा, शरीर देतोय ‘या’ आजारांचे संकेत

तणाव कमी घ्या

कामाच्या जागी तणावाचे वातावरण अधिक असते. पण या तणावाला नेहमी आपल्या आयुष्याचा भाग करु नका. याचा परिणाम बीपीवर होत असतो. तणाव कमी करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन आणि रिलॅक्सिंगचे काही योगा करु शकता. तज्ञांच्या मते, तणाव कमी केल्याने ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: How to control high blood pressure lifestyle news in marathi 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?
1

Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?

अचानक जास्त घाम येतोय? ही असू शकते धोक्याची घंटा, शरीर देतोय ‘या’ आजारांचे संकेत
2

अचानक जास्त घाम येतोय? ही असू शकते धोक्याची घंटा, शरीर देतोय ‘या’ आजारांचे संकेत

Health Alert: संध्याकाळी 7 नंतर चुकूनही करु नका ‘हे’ काम, हृदयावर होऊ शकतो गंभीर परिणाम
3

Health Alert: संध्याकाळी 7 नंतर चुकूनही करु नका ‘हे’ काम, हृदयावर होऊ शकतो गंभीर परिणाम

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
4

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.