पावसाळ्यात भिजलेले केस वाळवावे?
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर फिरून आल्यानंतर केस ओले चिंब होऊन जातात. केस भिजल्यानंतर ते वेळेत सुकवले नाहीतर केसांमध्ये कोंडा किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. पावसाच्या पाण्यामुळे ओले झाले केस सुकवणे अनेकदा कठीण होऊन जात. पण केस न सुकवता तसेच ठेवले तर केस खराब होऊन जातात. केस खराब झाल्यानंतर केसांसंबधित अनेक समस्या उद्भवतात. सतत केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, टाळूवर इन्फेक्शन होणे इत्यादी समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात केस भिजल्यानंतर कोरडे करण्यासाठी कोणती ट्रीक वापरावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे या पद्धतीचा वापर करून केस कोरडे करून पहा.(फोटो सौजन्य-istock)
पावसाळ्यात ओले झालेले केस स्वच्छ करण्यासाठी करण्यासाठी सगळ्यात आधी कॉटनचा किंवा पातळ टॉवेल घेऊन केसांना बांधून ठेवावा. तसेच केस पुसण्यासाठी शक्यतो मायक्रोफायबर टॉवेलचा वापर करावा. मायक्रोफायबर कापडमुळे केसांचे कमी घर्षण होते आणि केस स्वच्छ पुसले जातात. केसांचे कमी घर्षण झाल्यामुळे केस गळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे केस पुसण्यासाठी मायक्रोफायबरचा टॉवेल वापरावा.
हे देखील वाचा: दुधाच्या चहाऐवजी सकाळी उठल्यानंतर प्या ब्लॅक कॉफी, आरोग्याला होतील ‘हे’ गुणकारी फायदे
नेहमी केस पुसण्यासाठी मायक्रोफायबर टॉवेलचा वापर करावा. तसेच केस पुसताना ते जास्त घासू नये. जास्त केस घासण्याऐवजी हळुवारपणे केस पुसावे. केस घासून पुसण्याऐवजी जास्तीचे पाणी काढून टाकण्यासाठी टॉवेलचा वापर करावा. यामुळे केस गळणे आणि तुटणे थांबते.
केसांचे सौंदर्या कायम टिकवून ठेवण्यासाठी केस वाळल्यानंतर केसांना लीव्ह-इन कंडिशनर लावावे. यामुळे केस चमकदार आणि सुंदर दिसतात. केसांमधील ओलावा आणि फ्रिजीन्स कमी करण्याचे काम लीव्ह-इन कंडिशनर करते.
हे देखील वाचा: रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने होऊ शकतात या गंभीर समस्या, जाणून घ्या एक्सपर्टसचे विचार
ओले केस पुसण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करा. हेअर ड्रायरचा वापर करून केस सुकवल्यामुळे केसांमधील चमक कायम टिकून राहते. केसांवर कोणतेही हिटिंग टूल्स केस ७० ते ८० टक्के नैसर्गिक रित्या सुकल्यानंतर मगच वापरावे.