ब्लॅक कॉफी पिण्याचे आरोग्यदायी फायदे
सकाळी उठल्यानंतर अनेकांना दुधाचा चहा किंवा काळा चहा पिण्याची सवय असते. दुधाचा चहा प्यायल्याशिवाय त्यांची सकाळीच होत नाही. पण सकाळी सकाळी दुधाचा चहा प्यायल्यानंतर तो आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. अनेक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. पण चहा पिण्याऐवजी सकाळी उठल्यानंतर तुम्ही ब्लॅक कॉफी पिऊ शकता. ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी सकाळी उठल्यानंतर ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफीचे सेवन करावे. वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी हा एक उत्तम पर्याय आहे. कॉफीमध्ये असलेले कॅफिन फॅटी टिश्यूमधून फॅटी ऍसिडचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात, यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे तुम्ही व्यायाम करण्याच्या आधी किंवा नंतर ब्लॅक कॉफीचे सेवन करू शकता.
हे देखील वाचा: कोलेस्ट्रॉल, रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी उठल्यावर करा ‘ही’ योगासने
ब्लॅक कॉफी पिण्याचे आरोग्यदायी फायदे
पचन क्रिया सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर ब्लॅक कॉफी प्यावी. ब्लॅक कॉफी पोटात ऍसिडचे उत्पादन वाढवण्यास मदत करते, यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच ब्लॅक कॉफीचे सेवन केल्यामुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते.
हे देखील वाचा: श्रावणात चुकूनही खाऊ नका ‘ही’ फळे नाहीतर आरोग्य पडेल धोक्यात
रिकाम्या पोटी सकाळी उठल्यानंतर कॉफीचे सेवन केल्यामुळे कॅफिन ॲड्रेनालाईनची पातळी वाढून शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. शरीरातील कमी झालेली ऊर्जा भरून काढण्यासाठी सकाळी उठल्यानंतर कॉफीचे सेवन करावे. व्यायामापूर्वी ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे शरीराची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते. तसेच ब्लॅक कॉफीचे सेवन केल्यामुळे टाईप 2 मधुमेह, अल्झायमर आणि काही प्रकारचे कर्करोग या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.