वजन वाढविण्यासाठी हंसाजी योगेंद्र यांच्या खास टिप्स (फोटो सौजन्य - iStock/Instagram)
आजच्या काळात, काही लोक वाढत्या लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत, तर बऱ्याच लोकांची तक्रार असते की खूप प्रयत्न करूनही त्यांचे वजन वाढत नाही किंवा ते खूप बारीक दिसतात. यामुळे त्यांना अनेकांकडून ‘सांगाडा’ असल्याची उपाधीही मिळते. जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.
येथे आम्ही तुम्हाला वजन वाढवण्याचे आणि तंदुरुस्त शरीर मिळवण्याचे काही खास मार्ग सांगत आहोत. या पद्धती योगगुरू हंसा योगेंद्र, ज्या डॉ. हंसाजी म्हणून प्रसिद्ध आहेत, यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केल्या आहेत. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया आणि तुम्ही याचा वापर करून तुमचे वजन वाढविण्याचा प्रयत्न करू शकता.
कितीही खाल्लं तरीसुद्धा वजन वाढत नाही? मग नैसर्गिकरित्या वजन वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा
यूट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये डॉ. हंसाजी म्हणतात, अनेक वेळा लोक वजन वाढवण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त खाण्यास सुरुवात करतात. तर हा योग्य मार्ग नाही. याशिवाय, तुम्ही तुमच्या जीवनशैलीत आणि आहारात काही निरोगी सुधारणा करून तुमचे पातळ शरीर तंदुरुस्त बनवू शकता आणि फक्त एका महिन्यात त्याचा परिणाम जाणवू शकतो. वजन वाढवण्यासाठी सोपी योगासनं त्यांनी सांगितली आहेत. डॉ. हंसाजी म्हणतात, जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर नियमितपणे काही योगासन करा.
नियमित पवनमुक्तासन करा
योगामधील धनुरासनचा आधार घ्या
हंसाजीनी सांगितले वजन वाढविण्याचे उपाय
योगगुरूंच्या मते, फक्त जास्त खाल्ल्याने वजन वाढत नाही, तर संतुलित आहार, नियमित वेळी जेवण आणि चांगली झोप यांचे संयोजन देखील आवश्यक आहे. या काही सोप्या उपायांचा अवलंब केल्याने, तुम्हाला हळूहळू निरोगी वाटेल आणि तुमचे शरीर देखील तंदुरुस्त होऊ लागेल.
वजन वाढविण्याचा ‘जादुई फॉर्म्युला’, तुपासह खा 4 पदार्थ; आठवड्यात चढेल अंगावर मणभर मांस
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.