पावसाळ्यात घरी येणाऱ्या गोमचा खेळ खल्लास करेल हा 2 रुपयांचा पदार्थ; स्वस्त, सोपी आणि आयुर्वेदिक पद्धत जाणून घ्या
पावसाळा ऋतू सुरु झाला की याकाळात कीटकांचा प्रादुर्भाव देखील खूप वाढतो. बाहेरच काय तर या मोसमात आपल्या घरात मुख्यतः घराच्या बाथरूममध्ये गांडूळ, गोम अशा असे कीटक येऊ लागतात जे आपल्या आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करतात. गोम हा कीटक त्यातल्या जर जास्त घातक कारण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अनेकदा ही गोम बाथरूमवाटे आपल्या बेडरूममध्ये शिरते आणि आपल्या कानात शिरू पाहते. या किडीला ओलसर जागा खूप आवडतात. म्हणूनच तो स्वयंपाकघरातील सिंक, बाथरूमच्या नाल्या, बागेत आणि ओल्या भिंतींमध्ये अनेकदा दिसतो. पावसाळ्यात अनेकजण गोममुळे हैराण असतात अशात आज आम्ही तुम्हाला हिला आपल्या घरातून हाकलून काढण्यासाठीचा एक सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याने तुम्ही सहज गोमला आपल्या घरातून बाहेर करू शकतात. मुख्य म्हणजे यात तुमचे फार पैसेही जाणारा नाही आणि अगदी स्वस्तात तुम्ही हा उपाय घरच्या घरी करून गोमला घराबाहेर करू शकतात.
आवश्यक साहित्य
उपाय कसा तयार करायचा
यासाठी सर्वप्रथम जरा जास्तीचं मीठ घ्या आणि त्यात १ ते २ चमचे डिटर्जंट पावडर टाकून मिसळा. यानंतर त्यात २ ते ३ कापूरच्या गोळ्या बारीक करून टाका आणि या सर्व गोष्टी पाण्यात मिसळून याचे एक द्रावण तयार करा.
चेहऱ्यावर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, त्वचेचे होईल गंभीर नुकसान
कसं वापरणार?
तुम्ही जर हे द्रावण जरा जाड बनवलं असेल तर ज्या ठिकाणी गोम येते त्या ठिकाणी तुम्ही ते लावू शकता किंवा पातळ द्रावण स्प्रे बाटलीत भरून तुम्ही सर्वत्र स्प्रे करू शकता. तुम्हाला हवं असल्यास, हे द्रावण तुम्ही फारशी पुसायचा पाण्यात मिसळून फरशी देखील पुसू शकता. आयुर्वेद सिक्रेट टिप्सचा दावा आहे की गोमपासून मुक्त होण्याचा हा सर्वात अचूक मार्ग आहे आणि चुटकीसरशी तुमची समस्या दूर करेल. गोम हा कीटक मिठापासून दूर राहतो आणि कपूरचा वास कीटकांना दूर ठेवण्यास मदत करतो. या दोन गोष्टी डिटर्जंटमध्ये याचे चांगले प्रभावी रिजल्ट्स दिसून येतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.