नसांमध्ये साचून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित प्या 'हे' पेय
चुकीची जीवनशैली, कामाचा ताण, वारंवार बिघडणारी तब्येत, आहारात होणारे बदल, अपुरी झोप आणि बिघडलेल्या पचनक्रियेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल इत्यादी गंभीर आजारांची लागण शरीराला होते.शरीरामध्ये शारीरिक हालचालींची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर आजार होऊ लागतात. हे आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासोबतच वारंवार थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. आहारात नेहमीच तेलकट किंवा अतितिखट पदार्थ खाल्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांसोबतच संपूर्ण शरीराच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. ज्यामुळे शरीराच्या रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होऊन ऑक्सिजन पुरवठा होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणत्या पेयाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, त्वचेचे होईल गंभीर नुकसान
सकाळी उठल्यानंतर प्रत्येकालच चहा पिण्याची सवय असते. पण उपाशी पोटी चहाचे सेवन करण्याऐवजी आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. याशिवाय आल्यामध्ये जिंजरोलसारखे बायोअॅक्टिव्ह कंपाउंड असतात, ज्यामुळे रक्तात साचलेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर पडून जाते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित आल्याचे पाणी प्यायल्यास रक्तात जमा झालेली अनावश्यक चरबी बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. आल्याचे सेवन केल्यामुळे शरीराच्या आतील अवयवांना आलेली सूज कमी होते.
आल्याचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात किसलेलं आलं टाकून उकळवून घ्या.आल्याच्या पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर गॅस बंद करून गाळून घ्या. तयार केलेल्या पाण्यात गूळ किंवा मध टाकून सेवन केल्यास पोटात साचलेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल. आल्याचे पाणी प्रामुख्याने उपाशी पोटी प्यावे. यामुळे शरीरावर लगेच परिणाम दिसून येतात.
मुंबईमध्ये वाढतोय मेंदूच्या संसर्गजन्य आजाराचा धोका, पावसाळ्यात ‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी
आल्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात साचलेले वाईट कोलेस्ट्रॉल बाहेर पडून जाते. तसेच रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. शरीरातील चयापचयक्रिया वेगाने होते आणि खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. यासोबतच वाढलेले वजन कमी करताना कोणत्याही सप्लिमेंट्स पिण्याऐवजी आल्याचे पाणी प्यावे.
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे चरबीयुक्त द्रव्य आहे, जे आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होते. ते पेशींच्या भिंती, हार्मोन्स आणि व्हिटॅमिन डी बनवण्यासाठी आवश्यक असते, असे डॉ. लालPathLabs ने सांगितले आहे.
उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे काय आहेत?
उच्च कोलेस्ट्रॉलची कोणतीही विशिष्ट लक्षणे नसतात, परंतु अत्यंत उच्च पातळीमुळे छातीत दुखणे, हृदय धडधडणे आणि धाप लागणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.
उच्च कोलेस्ट्रॉल कसे कमी करावे?
उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी निरोगी आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रित करणे आणि धूम्रपान टाळणे आवश्यक आहे, असे हेल्थलाइनमध्ये नमूद केले आहे.